मुंबई

सुपर अ‍ॅग्री-बिझनेस प्रशिक्षणाचे आयोजन

CD

एसआयआयएलसी

शेती व्यवसाय संबंधित मार्गदर्शन

पुणे, ता. २५ ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्रॅम अंतर्गत या प्रशिक्षणात फूड प्रोसेसिंग, व्हॅल्यू अ‍ॅडिशन, अ‍ॅग्री-स्टार्टअप्स व सेवा आधारित उच्च नफा देणाऱ्या शेती व्यवसाय संधींबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये कमी जमिनीत जास्त उत्पन्न देणारी स्क्वेअर इंच फार्मिंग संकल्पना, स्मार्ट व शाश्वत शेती पद्धती, ई-कॉमर्सद्वारे थेट विक्री, ब्रँडिंग व पॅकेजिंग तसेच प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया योजना व नाबार्ड योजनांमधील अनुदान व कर्ज मार्गदर्शन यावर माहिती दिली जाणार आहे. हे प्रशिक्षण २८ फेब्रुवारीला आयोजित केले आहे.

ॲमेझॉनवर विका स्वतःची उत्पादने
ॲमेझॉनवर उत्पादन विकायचे असेल तर त्याची प्रक्रिया काय आहे, नोंदणी कशी करावी, कोणती कागदपत्रे लागतात, किती दिवस लागतात, हे सर्व करून बिझनेस कसा वाढवायचा, ॲमेझॉनवर विक्री करण्यास किती खर्च लागतो, सेलर पोर्टल कसे असायला हवे आदींबाबत मार्गदर्शन करणारी ऑनलाइन कार्यशाळा २८ फेब्रुवारीला आयोजिली आहे. कार्यशाळेत उत्पादन कसे लिस्ट करावे, डिलिव्हर करावे, रिटर्न्स असतील तर ते कसे हाताळावे, ॲमेझॉन ॲपवरती उत्पादन जास्तीत जास्त कसे दिसतील जेणेकरून विक्री वाढेल, सवलती कशा ठेवायच्या, उत्पादन स्पॉन्सर कसे करायचे, पेमेंट कसे पाहायचे, तत्काळ सपोर्ट कसा घ्यायचा याबाबत मार्गदर्शन होईल.

क्लाऊड किचन व्यवसायाद्वारे वाढवा उत्पन्न
कमी गुंतवणुकीत स्वतःचा क्लाऊड किचन व्यवसाय कसा सुरू करायचा, याबाबत मार्गदर्शन करणारी कार्यशाळा १५ मार्चला आयोजिली आहे. क्लाऊड किचनमध्ये व्यावसायिक स्वयंपाकघरातील जागा वापरून फक्त डिलिव्हरी किंवा टेकअवेसाठी अन्न तयार केले जाते, ज्यामध्ये संपूर्ण रेस्टॉरंट सेटअपची आवश्यकता नसते. यामुळे हा खूप स्वस्त आणि सुरुवात करण्यास सोपा असा व्यवसाय आहे. कार्यशाळेत स्वतःचा क्लाऊड किचन ब्रँड कसा सुरू करावा, घरून मेस किंवा कॅन्टीन कसे चालवावे, कॅफे किंवा रेस्टॉरंट्सद्वारे स्वयंपाकघर कसे व्यवस्थापित करावे, स्वच्छता आणि सुरक्षितता कशी राखावी यासह सरकारी नियम, परवाने आणि नियम याबाबत मार्गदर्शन होणार आहे. ज्यांना हॉटेल, टिफिन सेवा किंवा मेस व्यवसाय उघडायचा आहे, परंतु मोठे बजेट नाही, त्यांच्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त आहे.
संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ८९५६३४४४७१, ९३५६९७३४२७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT