एसआयआयएलसी
महारेरा परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
पुणे, ता. १६ : महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण (MahaRERA) अंतर्गत रिअल इस्टेट एजंट परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, ती १ एप्रिल २०२६ पर्यंत खुली राहणार आहे. ज्या उमेदवारांनी आवश्यक प्रशिक्षण पूर्ण केले आहे, त्यांनी तत्काळ परीक्षा अर्ज प्रक्रिया करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. यापूर्वी प्रशिक्षण पूर्ण करूनही मागील टप्प्यात परीक्षा अर्ज भरू न शकलेले उमेदवारही आता अर्ज करू शकतात. महारेरा परीक्षेसाठी २० तासांचे अधिकृत प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे. जे सहभागी सध्या प्रशिक्षण घेत आहेत, त्यांनी परीक्षा अर्ज प्रक्रिया बंद होण्यापूर्वी आपले प्रशिक्षण पूर्ण करावे, जेणेकरून त्यांच्या रिअल इस्टेट व्यवसायाच्या सुरुवातीला विलंब होणार नाही. प्रशिक्षण व परीक्षेबाबत सविस्तर मार्गदर्शन लवकरच दिले जाणार असून, महारेरा अधिकृत प्रशिक्षणासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी इच्छुकांनी संपर्क साधावा. प्रशिक्षणासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
संपर्क : ८४८४८२२८५५, ८९५६३४४४७५, ७३५०००१६०२, ७३५०००१६०३
शासकीय ई-निविदा प्रक्रिया प्रशिक्षण
विविध शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक विश्वस्त संस्था, देवस्थाने आता ई-निविदा प्रक्रिया राबवत आहेत. याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण २९ मार्च रोजी आयोजिले आहे. प्रशिक्षणात विविध विभागातील नोंदणी, न दिसणाऱ्या निविदासुद्धा कशा शोधायच्या, बीओक्यू भरताना येणाऱ्या अडचणी, निविदेसाठी लागणारी कागदपत्रे, कागदपत्रे डिजिटली सही करून कशी सादर करायची, इएमडी व एसडी मध्य सूट कशी मिळवायची, स्वतःकडे मशिनरी नसतील तर करावयाचे भाडेकरार, निविदापूर्व बैठकीला जाण्यापूर्वी करावयाच्या पंधरा महत्त्वपूर्ण गोष्टी कोणत्या याबाबत तसेच इतर महत्त्वाच्या तांत्रिक गोष्टींबद्दल सविस्तर मार्गदर्शन होणार आहे. सरकारी कंत्राटदार, सिव्हिल, इलेक्ट्रिकल इंजिनिअर्स, मटेरियल पुरवठादार, वाहतूक करणारे, कौशल्य विकास क्षेत्रात काम करणारे, बचतगट, मॅनपॉवर सप्लाय एजन्सी व विद्यार्थ्यांसाठी हे प्रशिक्षण उपयुक्त आहे.
डिहायड्रेशन व्यवसाय प्रशिक्षण
निर्जलीकरण व्यवसाय संधींविषयी मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण थेट निर्जलीकरण उद्योग प्रकल्पात ४ व ५ एप्रिल रोजी आयोजिले आहे. प्रशिक्षणात निर्जलीकरण म्हणजे काय, या तंत्रज्ञानाचे महत्त्व, उपयोग, व्यवसाय म्हणून तो कसा करावा, निर्जलीकरणासाठीचे प्रमुख घटक, वेगवेगळ्या पद्धती, निर्जलीकरणाद्वारे तयार होणारे घटक पदार्थ व त्याचे उपयोग, उत्पादन व बाजारातील किंमत, निर्जलीकरणासाठी लागणाऱ्या मशिनरी, त्याचा फ्लो चार्ट, उपलब्ध बाजारपेठ, विपणन पद्धती, शासकीय योजना व अनुदान, प्रकल्प उभारण्यासाठी जागेची निवड, अंदाजे गुंतवणूक, प्रकल्प अहवाल इ. विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. फळभाज्या, पालेभाज्या, कंद, पानवर्गीय वनस्पती, आयुर्वेदिक वनस्पती, फळे, दुग्धजन्य पदार्थ, मांस, मच्छी, चिकन या पदार्थांचे प्रात्यक्षिक होणार आहे.
एसआयआयएलसीच्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी व नावनोंदणीसाठी
संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ८९५६३४४४७१, ९३५६९७३४२७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.