मुंबई

‘स्क्रिप्ट रायटिंग आणि स्क्रीनप्ले रायटिंग’ कार्यशाळा

CD

पुणे, ता. १५ : चित्रपटासाठी कल्पनेचे प्रभावी कथेत आणि कथेचे पटकथेत रूपांतर करण्याचे तंत्र शिकवणारी ‘स्क्रिप्ट रायटिंग आणि स्क्रीनप्ले रायटिंग’ ही तीन दिवसीय विशेष कार्यशाळा १६, १७ व १८ नोव्हेंबरला आयोजित करण्यात आली आहे. यात चित्रपट निर्मितीची प्रक्रिया, आशय निर्मिती, कथेचा विकास, सिनेमॅटिक दृश्यभाषा, स्क्रीनप्लेची रचना, प्रसंगांची मांडणी, व्यक्तिरेखांची जडणघडण आणि थ्री-ॲक्ट स्ट्रक्चर यांविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच प्रात्यक्षिके आणि असाइनमेंटच्या माध्यमातून प्रत्यक्ष पटकथा लेखनाचा सराव करून घेतला जाईल. त्यामुळे सहभागींना शिकलेल्या संकल्पनांचा लेखनात वापर करण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थी, शॉर्ट फिल्म निर्माते, असिस्टंट डायरेक्टर्स तसेच चित्रपट क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४, ८४८४८२२१६६


व्यावसायिक मसाले कार्यशाळा
घरगुती चवीचे झणझणीत कोल्हापूर स्टाईल मसाले प्रात्यक्षिकासह शिकवणारी कार्यशाळा २८ व २९ नोव्हेंबरला आयोजिली आहे. यात सुमारे दहा प्रकारचे मसाले प्रत्यक्ष तयार करून शिकवले जातील. त्याच्या नोट्स पुरवल्या जातील. यामध्ये पहिल्या दिवशी बिर्याणी, चिकन, मटण, चाट, किचन किंग, मालवणी कोकणी, काळा, कोल्हापुरी कांदा लसूण, मिसळ, गोडा, पेरी पेरी, गरम इत्यादी मसाले प्रात्यक्षिकासह शिकवले जातील. दुसऱ्या दिवशी मसाला व्यवसाय उभा करण्यासाठी लागणारे भांडवल, कच्च्या मालाची खरेदी व उपलब्धता, मसाला व्यवसायाला असणारी मागणी व त्याचे स्वरूप, उपलब्ध असणारी बाजारपेठ, मार्केटिंग करण्याच्या पद्धती, मसाला व्यवसायासाठी लागणारी जागा, प्रोजेक्ट रिपोर्ट, लागणारी मशिनरी, कॉस्टिंग आदींविषयी माहिती दिली जाईल.

संपर्क : ८४८४८११५४४, ८४८४८२२१६६

यूडीपीसीआर आणि मुंबई डीसीपीआर २०३४ प्रशिक्षण
रिअल इस्टेटमधील भूखंडाची विकास क्षमता, एफएसआय, टीडीआर आणि पुनर्विकास प्रकल्पांची व्यवहार्यता समजून घेण्यासाठी विशेष ऑनलाइन मास्टर क्लासचे आयोजन ३० नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. प्रशिक्षणात महाराष्ट्रातील यूडीपीसीआर नियम, त्यांचे लागू क्षेत्र, बेसिक व प्रीमियम एफएसआय, टीडीआर गणना, सेटबॅक, मोकळ्या जागा, पार्किंग आणि प्रकल्प व्यवहार्यता यांचे मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच मुंबई डीसीपीआर २०३४ मधील विकास नियंत्रण नियम, भूखंड विश्लेषण, अतिरिक्त विकास क्षमता, पुनर्वसन व विक्रीयोग्य क्षेत्र, बांधकाम परवानग्या आणि मंजुरी प्रक्रिया यांचे प्रत्यक्ष उदाहरणांसह विश्लेषण केले जाईल. मूल्यनिर्धारक, अभियंते, वास्तुविशारद, बिल्डर्स, डेव्हलपर्स, रिअल इस्टेट व्यावसायिक, सोसायटी पुनर्विकास समिती सदस्य आणि संबंधित विद्यार्थी यांच्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solar Stock To Buy : ६ महिन्यांत ३३% परतावा! आता थेट ₹५०० पर्यंत झेप घेणार 'हा' सोलार शेअर; ब्रोकरेज फर्मचा मोठा सल्ला

Bollywood Sad News : "ती जाणार नाही असं वाटलं होतं..."; लाडक्या मुलीच्या कॅन्सर निधनानंतर प्रसिद्ध दिग्दर्शकाचा अश्रूंचा बांध फुटला!

Latest Marathi News Live Update : मी पुढच्या वेळी राज ठाकरे यांना छठ पूजेचं आमंत्रण देणार - कृपाशंकर सिंह

मोठी बातमी! मोदी सरकार हिवाळी अधिवेशनात मांडणार डिलिमिटेशन बिल? बहुमताचं गणित जुळवलं?

Suryakumar Yadav : मैदानावर धुरळा, अन् मग सूर्यकुमारची सामन्यानंतर सरफराज खानसोबत मटण पार्टी! Viral Video

SCROLL FOR NEXT