पुणे, ता. ९ : सकाळ संलग्न कौशल्य प्रशिक्षण संस्था एसआयआयएलसी आणि ईशान्य फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १८ ते ३५ वयोगटातील तरुण-तरुणींसाठी जीएसटी अकाउंट असिस्टंट आणि ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन या विषयांचे विनामूल्य प्रशिक्षण २० ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या रोजगाराभिमुख प्रशिक्षण वर्गांमध्ये वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी ‘जीएसटी अकाउंट असिस्टंट’ आणि कला किंवा इतर शाखेतील विद्यार्थ्यांसाठी ‘ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन’या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. याबरोबरच विद्यार्थ्यांना नोकरीच्या ठिकाणी आवश्यक असणारी महत्त्वाची कौशल्ये जसे की संगणक, इंग्रजी संभाषण आणि व्यक्तिमत्त्व विकास इ. विषयांचेदेखील मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच नोकरी मिळवून देण्यासाठी खात्रीशीर सहाय्य पुरवले जाईल. इच्छुक विद्यार्थ्यांनी चाळ नंबर ८८/४, डांबर कोठी, पर्वती दर्शन, स्वारगेट, पुणे या प्रशिक्षण ठिकाणी भेट द्यावी.
संपर्क : ८६६८७६२२४०, ९०४९५४२७२५
इन्स्टंट पिठे व इन्स्टंट प्रीमिक्स कार्यशाळा
सध्याच्या धावपळीच्या युगात इन्स्टंट फूडला बाजारपेठेमध्ये खूप मागणी आहे. हे लक्षात घेऊन इन्स्टंट पिठे व इन्स्टंट फूड प्रीमिक्स तयार करण्यास शिकवणारी कार्यशाळा २४ व २५ ऑक्टोबरला हाेणार आहे. यात डोसा प्रीमिक्स, इडली प्रीमिक्स, आईस्क्रीम प्रीमिक्स, गुलाबजामुन प्रीमिक्स, पोहे प्रीमिक्स, उपमा प्रीमिक्स, पराठा प्रीमिक्स, थालीपीठ प्रीमिक्स, ढोकळा प्रीमिक्स, पकोडा प्रीमिक्स, दाल खिचडी प्रीमिक्स, पुलाव प्रीमिक्स, सरबत प्रीमिक्स, मिल्कशेक प्रीमिक्स, केक प्रीमिक्स, मल्टीग्रेन पराठा प्रीमिक्स, खीर प्रीमिक्स, रबडी प्रीमिक्स हे पदार्थ कृतीसह शिकवले जातील. या उत्पादनांना बाजारपेठेत असलेल्या संधी, प्रॉडक्ट मार्केटिंग, कॉस्टिंग, पॅकिंग, लेबलिंग, आवश्यक मशिनरी इ. विषयी मार्गदर्शन होणार आहेत. कार्यशाळा पूर्ण केल्यास नोट्स व डिजिटल प्रमाणपत्र मिळेल. संपर्क : ८४८४८११५४४
व्यावसायिक हायड्रोपोनिक्स भाजीपाला कार्यशाळा
व्यावसायिक हायड्रोपोनिक्स भाजीपाला कार्यशाळा २४ व २५ ऑक्टोबरला होणार आहे. शेतीसाठी उपलब्ध होत असलेली मर्यादित जमीन, पाण्याची टंचाई आणि रसायनमुक्त, दर्जेदार भाजीपाल्याची वाढती मागणी लक्षात घेता हायड्रोपोनिक्स हे आधुनिक आणि फायदेशीर तंत्रज्ञान म्हणून वेगाने लोकप्रिय होत आहे. कमी जागेत, कमी पाण्याचा वापर करून वर्षभर उच्च दर्जाचा भाजीपाला उत्पादन घेण्याची संधी या तंत्रज्ञानामुळे उपलब्ध होत आहे. कार्यशाळेत हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाची ओळख, आवश्यक साधने व फर्टीगेशन, पाण्याची गुणवत्ता व आवश्यक अन्नद्रव्ये, देशी-विदेशी भाज्या, पालेभाज्या, फळभाज्या, औषधी वनस्पती आदी विविध पिकांचे उत्पादन, घरच्या घरी हायड्रोपोनिक युनिट अथवा गार्डन कसे उभारावे, रोपे कशी तयार करावीत, न्यूट्रिएंट सोल्युशन तयार करण्याची पद्धत, pH व EC नियंत्रण, प्रकाश, आर्द्रता आणि तापमानाचे व्यवस्थापन तसेच अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे व त्यावरील उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.