मुंबई

एसआयआयएलसी

CD

एसआयआयएलसी

आयात-निर्यात व्यवसाय प्रशिक्षण
पुणे, ता. ७ : आजच्या स्पर्धात्मक आणि जागतिकीकरणाच्या युगात व्यापाराला सीमारेषा राहिलेल्या नाहीत. भारतीय उत्पादने जगभरात पोहोचू शकतात, फक्त योग्य मार्गदर्शन, नियोजन आणि धोरणे असणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर १३ एप्रिलपासून सात दिवसांचे ‘आयात-निर्यात व्यवसाय संधी व व्यवस्थापन’ हे प्रशिक्षण होणार आहे. प्रशिक्षणात EXIM धोरण, IncoTerms, शिपिंग आणि कंटेनर व्यवस्थापन, दररचना व आंतरराष्ट्रीय मालवाहतूक, तसेच पॅकेजिंग, लेबलिंग, डिजिटल टूल्स आणि सरकारी योजना यावर अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल. स्टार्टअप्स, लघुउद्योजक, व्यापारी आणि नवउद्योजकांसाठी हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरेल.

शिका सरबत, मॉकटेलचे विविध प्रकार
उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणाऱ्या पेयांना वाढती मागणी लक्षात घेऊन सरबत व मॉकटेल तयार करण्याचे प्रशिक्षण देणारी विशेष कार्यशाळा १८ एप्रिलला होणार आहे. कार्यशाळेत नैसर्गिक फळांपासून तसेच विक्रीयोग्य कृत्रिम पद्धतीने विविध प्रकारची सरबते आणि नावीन्यपूर्ण मॉकटेल्स तयार करण्याचे मार्गदर्शन केले जाईल. विविध मॉकटेल्स बनवण्याच्या नावीन्यपूर्ण रेसिपीज आणि त्यांचे सादरीकरण, पॅकिंग, कॉस्टिंग, प्रिझर्वेशन, सरबत टिकवण्याच्या पद्धती तसेच बाजारपेठ आणि विक्री तंत्र यावरही मार्गदर्शन होणार आहे.

नगरसेवकांसाठी एकदिवसीय मार्गदर्शन कार्यशाळा
नगरसेवक म्हणून प्रभावीपणे कार्य करण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि प्रशासनाची सखोल समज विकसित करण्यासाठी एकदिवसीय विशेष कार्यशाळा १८ एप्रिलला होणार आहे. कार्यशाळा विद्यमान तसेच इच्छुक नगरसेवक, राजकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे युवक, सामाजिक कार्यकर्ते आणि सार्वजनिक प्रशासनात रस असणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल. महापालिका कामकाजाची रचना, कायदे, अधिसभा व विषय समित्यांचे कार्य, तसेच शासन व प्रशासनाशी प्रभावी संपर्क आणि समन्वय, निधी मिळवण्याच्या प्रक्रिया, अर्थसंकल्पाचे नियोजन आणि विकासकामांसाठी निधीचा योग्य वापर कसा करावा आदींविषयी सविस्तर मार्गदर्शन दिले जाणार आहे.

‘एसआयआयएलसी’च्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी व नावनोंदणीसाठी.
संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ८९५६३४४४७१, ९३५६९७३४२७. क्यूआर कोड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Dudh Sangh election 2026 : 'गोकुळ'च्या निवडणुकीचा बिगुल वाजणार; १ जुलैपासून ठराव दाखल करण्याचे आदेश

Ganga Dussehra: भागीरथ प्रयत्नांची ती अमर गाथा! गंगा दशहऱ्याला काशीत भाविकांचा महापूर; जाणून घ्या आध्यात्मिक महत्त्व

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्ग : तहसीलदार देणार बिगरशेतीची माहिती, १५ दिवसात जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल

पेट्रोल-डिझेल दरवाढ, तुटवड्याने शेतकरी अडचणीत; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जागतिक संकट अन् मागणीही वाढलीय

MI vs RR: आधी आऊट, मग नो बॉल अन् चौकार... जडेजाने शार्दुल ठाकूरची भर मैदानात उडवली खिल्ली! Video होतोय Viral

SCROLL FOR NEXT