मुंबई

कुंडलिका खाडीत सापडलेल्या वृद्ध महिलेच्या मृतदेहाची ओळख पटली

CD

कुंडलिका खाडीत सापडलेल्या वृद्ध महिलेच्या मृतदेहाची ओळख पटली
रेवदंडा, ता. १ (बातमीदार) ः कुंडलिका खाडीत रेवदंडा मच्छिमार जेटीजवळ मंगळवारी (ता. ३१) सायंकाळी आढळून आलेल्या वृद्ध महिलेच्या मृतदेहाची ओळख पटल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली आहे. ही मृत महिला सुनिता मुरूडकर (वय ८४, रा. बोर्ली, ता. मुरूड) असल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुनिता मुरूडकर या पनवेल येथे त्यांच्या मुलीकडे वास्तव्यास होत्या. मात्र मंगळवारी (ता. ३१) त्यांनी घरातील कोणालाही न सांगता पनवेल येथून निघून आल्याचे समोर आले आहे. त्या मणक्याच्या आजाराने त्रस्त होत्या, तसेच त्यांना विस्मरणाचा त्रास असल्याची माहिती नातेवाइकांनी दिली आहे. सायंकाळच्या सुमारास रेवदंडा मच्छिमार जेटीजवळ कुंडलिका खाडीत एका वृद्ध महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. स्थानिक नागरिकांनी याची माहिती तत्काळ रेवदंडा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला होता. सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटली नव्हती. नंतर नातेवाइकांशी संपर्क साधल्यानंतर मृत महिलेची ओळख सुनिता मुरूडकर अशी पटली. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पुढील तपास रेवदंडा पोलिस करीत आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूबाबत अधिक माहिती समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS : पथूम निसंका पहिला शतकवीर! श्रीलंका Super 8s मध्ये, ऑस्ट्रेलियाचे नशीब 'आयर्लंड'च्या हाती; जाणून घ्या समीकरण

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Muhammad Yunus Resigns : मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारपदाचा दिला राजीनामा!

Mani Shankar Aiyar : ‘’मी गांधीवादी, नेहरूवादी, राजीववादी आहे, पण राहुलवादी नाही’’ ; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर थेटच बोलले..!

Pune Shivjayanti : रस्त्याच्या कामामुळे शिवजयंती मिरवणूक मार्गात बदल; महापौरांचे आदेश

SCROLL FOR NEXT