मुंबई

चौल येथील पांडवकालीन हिंगुलजा देवीच्या यात्रेला प्रतिसाद

CD

चौल येथील पांडवकालीन हिंगुलजा देवीच्या यात्रेला प्रतिसाद
पौष पौर्णिमेनिमित्त भाविकांची गर्दी; गुजराती समाजाचे आराध्य दैवत
रेवदंडा, ता. ३ (बातमीदार) : चौल नाका ते वावे रस्त्यावर, गायचोळे भागात एका टुमदार टेकडीवर सिंधू संस्कृतीशी नाते सांगणारे हिंगुलजा देवीचे प्राचीन मंदिर वसले आहे. या मंदिरात दरवर्षी पौष पौर्णिमेच्या दिवशी एकदिवसीय यात्रा भरते. यावर्षीही ही यात्रा ता. ३ रोजी भक्तिभावाच्या वातावरणात उत्‍साहात पार पडली. गुजराती समाजाचे हे आराध्य दैवत असून सुमारे १४० वर्षांपूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे.
अलिबाग तालुक्यातील चौल हे ऐतिहासिक, पुरातन आणि श्रीमंत नगर म्हणून ओळखले जाते. एकेकाळी उत्तम बंदर म्हणून प्रसिद्ध असलेल्या या परिसराला निसर्गाचा भरभरून वरदहस्त लाभलेला आहे. समुद्रकिनारा, हिरवीगार टेकडी, ऐतिहासिक वास्तू आणि प्राचीन संस्कृतीचा ठसा लाभलेला चौल परिसर आजही अभ्यासक, पर्यटक आणि भाविकांचे आकर्षण ठरते. याच भागातील टेकडीवर मंदिर बांधण्यात आले आहे. इतिहास अभ्यासकांच्या मते, सिंधू संस्कृती दक्षिणेकडे सरकली, त्यावेळी या देवतेची विविध भागांत मंदिरे उभारली गेली. चौल येथील हिंगुलजा देवीचे मंदिर त्यापैकीच एक महत्त्वाचे मंदिर मानले जाते. या मंदिरास पांडवकालीन वारसा असल्याचे सांगितले जाते. संपूर्ण मंदिर एका मोठ्या खडकात कोरलेले असून टेकडीवजा पर्वतावर वसलेली ही वास्तू पाहताना प्राचीन स्थापत्यकलेचे वैभव जाणवते. मंदिरात पार्वतीच्या रूपात असलेली हिंगुलजा देवी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मंदिरात पोहोचण्यासाठी सुमारे दोनशे पायऱ्या चढाव्या लागतात. या पायऱ्या चढून गेल्यानंतर मंदिराचा विस्तीर्ण प्रांगण आणि आजूबाजूचा परिसर निसर्गसौंदर्याने मन मोहून टाकतो. त्यामुळे काही जण या भागाला ‘लेणी’ असेही संबोधतात. एका मोठ्या पाषाणात मंदिर कोरलेले असून उजव्या बाजूस आशापुरी देवीचे मंदिर आणि त्यानंतर हिंगुलजा देवीचे मुख्य मंदिर आहे.
..................
प्राचीन स्‍थापत्यकलेचे प्रतिक
हे मंदिर कोळी, कासार आणि महाजनी समाजाचे कुलदैवत म्हणून मानले जाते. मंदिर जागृत असून विशेष म्हणजे चेवली भानुशाली समाजाची मंडळी वर्षभर मुंबईत वास्तव्यास असली तरी पौष पौर्णिमेच्या यात्रेला आवर्जून उपस्थित राहतात. गुजराती समाजाचे हे आराध्य दैवत असून सुमारे १४० वर्षांपूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. दरवर्षी या एकदिवसीय यात्रेस पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. आजही पौर्णिमेच्या सायंकाळी होम-हवन करण्यात येते. यावेळी देवीच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी उसळते. हे मंदिर केवळ धार्मिकच नव्हे तर पर्यटन आणि अभ्यासाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. काही अभ्यासक व पर्यटक येथे लेणी आणि प्राचीन स्थापत्यकलेचा अभ्यास करण्यासाठी भेट देतात. श्रद्धा, इतिहास आणि निसर्ग यांचा संगम साधणारी चौल येथील हिंगुलजा देवीची यात्रा आजही परिसराच्या सांस्कृतिक परंपरेचे जिवंत प्रतीक ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: प्रेयसीचा मॅसेज आला अन् भेटायला गेला …; काही तासांतच आईला फोन, प्रेमसंबंधातून तरूणाला संपवलं, कोथरूडमध्ये काय घडलं?

LPG गॅस कमतरतेच्या अफवा वाढल्या अन् प्ले स्टोअरवर झाला धूमाकुळ; नंबर 1 डाउनलोडवर पोहोचले 'हे' ॲप, जाणून घ्या का वाढली डिमांड

पश्चिम बंगाल, तामिळनाडू अन् आसामसह पाच राज्यात वाजवणार बिगुल, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद...

अरे व्वा! अनुष्का शेट्टी लवकरच करणार लग्न? वयाच्या 44 व्या वर्षी व्यावसायिकासोबत बांधणार लग्नगाठ?

Rasgulla Choking Death : लग्नात जेवताना घशात रसगुल्ला अडकल्याने मृत्यू, विचित्र घटनेने सगळेच हादरले; डॉक्टरांनी सांगितले नेमके कारण

SCROLL FOR NEXT