महाड मार्गावर अनियमित बसफेऱ्या
वाहतूक नियंत्रक कक्षही बहुतांश वेळ बंद
रेवदंडा, ता. १५ (बातमीदार) : मुरूड आगारातून रेवदंडा, रोहा मार्गे महाडकडे जाणारी एकमेव लालपरी अनियमित धावत असल्याने प्रवासी आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. सकाळी पावणेआठच्या सुमारास रेवदंडा बस स्थानकात येणाऱ्या या बसवर दक्षिण रायगडातील विविध भागांत जाणारे प्रवासी अवलंबून आहेत. बस वेळेवर न आल्यास विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयांना दांडी मारावी लागत असून, पर्यायी प्रवासासाठी आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे.
मुरूड आगारातून सुटणारी ही बस रेवदंडा, रोहा, कोलाड आणि लोणेरे मार्गे महाडकडे जाते. रोहा औद्योगिक वसाहतीतील विविध कार्यालयांमध्ये जाणारे कर्मचारी, शिक्षणासाठी प्रवास करणारे विद्यार्थी तसेच स्थानिक भाज्यांची विक्री करण्यासाठी जाणाऱ्या महिला या बसचा नियमित वापर करतात. सातारा आणि तळकोकणाकडे जाणारे काही प्रवासीही महाडपर्यंत पोहोचण्यासाठी या बसवर अवलंबून असतात, मात्र बस अनियमित झाल्याने त्यांना पर्यायी वाहनांचा आधार घ्यावा लागतो.
चौकशीची सुविधाही अपुरी
रेवदंडा बस स्थानकातील वाहतूक नियंत्रक कक्ष सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेतच सुरू असतो. त्यामुळे सकाळी बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना चौकशीसाठी कोणताही आधार मिळत नाही. रोहा आगाराची रेवदंडा-रोहा शटल सेवाही सुमारे दीड तासांच्या अंतराने असल्याने प्रवाशांची अडचण वाढते. मुरूड आगाराने महाड मार्गावरील ही एकमेव बस नियमित वेळापत्रकानुसार चालवावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.