tomato price reaches 100 rupees per kg in mumbai
tomato price reaches 100 rupees per kg in mumbai  
मुंबई

मुंबईत टोमॅटोचे भाव भिडले गगनाला!

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आधीच महागाईमुळे त्रासलेल्या जनतेला आता टोमॅटोच्या किंमत वाढीमुळे आणखी अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. साधारण 20 ते 30 रूपये प्रतीकिलोग्राम असणार्‍या टोमॅटोची किंमत घाऊक बाजारात 80 रूपये किलो तर किरकोळ बाजारात 100 रूपये प्रतीकिलो पर्यंत झाली आहे. टोमॅटोच्या या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्य लोकांच्या बजेटवर परिणाम होत आहे. (tomato price reaches 100 rupees per kg in mumbai)

याबाबत घाऊक व्यापार्‍यांनी अशी माहिती दिली की, मुंबईमध्ये दक्षिण भारतातील केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील नाशिक आणि पुणे येथून टोमॅटोची आयात केली जाते. पण यावेळी दक्षिण भारतात झालेल्या पावसामुळे टोमॅटोच्या शेतीचं मोठं नुकसान झाले आहे. तर त्यामुळे महाराष्ट्रातील टोमॅटोची मागणी दक्षिण भारतात वाढली, तर दुसरीकडे नाशिकमध्ये पांढऱ्या माश्यांमुळे टूटा अब्सलुटा वायरस पसरल्यामुळे टोमॅटोचं मोठे नुकसान झालं आहे.

टोमॅटो उत्पादक शेतकर्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार एक एकर शेतीसाठी साधारण लाखभर रुपये खर्च येतो, त्यात कडक उन्हाळ्याचा त्रास आणि माश्यांमुळे एवढा त्रास झाला आहे की, जिथे 100 क्रेट उत्पादन व्हायचे तेथे केवळ 5 ते 10 क्रेट उत्पादन मिळत आहे. कोणत्याही औषधांचा देखील परिणाम होत नसल्याने नुकसान टाळता येणं अशक्य होत आहे. एका दुसर्‍या व्यापार्‍याने देखील असे सांगितले की, केरळ, कर्नाटकातील पावसामुळे दक्षिणेत टोमॅटोची मागणी वाढली आहे. मालाच्या गरजेमुळे दक्षिणेतील व्यापारी मुंबईत आले आहेत. यामुळे टोमॅटोचा भाव 55 ते 60 रुपये झाला आहे म्हणजेच 1000 ते 1200 रुपये प्रती क्रेट. भाजीपाला व्यापाऱ्यांचे मत आहे की, मागणी आणि पुरवठ्यातील तफावत वाढत राहिल्यास टोमॅटोचे भाव असेच गगनाला भिडत राहतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Constitution : '...तर मोदी सरकारने केव्हाच देशाचे संविधान बदलले असते'

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

SCROLL FOR NEXT