मुंबई

टॉप्स सिक्युरिटी प्रकरण:  ईडीकडून MMRDAच्या आयुक्तांना समन्स

पूजा विचारे

मुंबई: शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे गाजलेल्या टॉप्स सिक्युरिटी प्रकरणात आता ईडी म्हणजेच सक्तवसुली संचलनालयानं MMRDAच्या आयुक्तांना समन्स बजावले आहे. ईडीकडून MMRDAचे आयुक्त आर.ए. राजीव यांना समन्स बजावलेत. त्यामुळे आता समन्स बजावल्यामुळे आर.ए. राजीव यांना ईडीसमोर हजर राहावं लागणार आहे. या चौकशीत ते काय सांगतात आणि त्याचे काय परिणाम होणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

या प्रकरणात ईडीनं आतापर्यंत दोघांना अटक केली आहे. यामध्ये प्रताप सरनाईक यांचे व्यावसायिक भागीदार अमित चांदोळे यांचा समावेश होता. २०२० डिसेंबरला ईडीनं शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना समन्स बजावले होते. त्यानंतर त्यांची चौकशीही करण्यात आली होती. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा पूर्वेश सरनाईकचीही चौकशी केली होती. 

नेमका घोटाळा काय आहे? 

१७५ कोटींच्या कंत्राटासाठी टॉप्स ग्रुपकडून एमएमआरडीएनं ७ कोटींची लाच दिली होती. टॉप्स सिक्युरिटीटे माजी कर्मचारी रमेश अय्यर यांनी २८ ऑक्टोबरला तक्रार दाखल केली होती. दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता. 

टॉप्स सिक्युरिटीचे राहुल नंदा यांच्याकडून १०० पैकी केवळ ७० टक्के गार्ड्स वापरले जायचे. ३० टक्के गार्ड्सचा वापर करण्यात येत नव्हता. जवळपास १५० च्या आसपास गार्ड्सचा वापर केला जात नव्हता. मात्र तरीही त्या गार्ड्सची रक्कम सगळी टॉप्सच्या ग्रुपला मिळत होती. त्यातली काही रक्कम लाच म्हणून अमित चांदोळे आणि संकेत मोरे यांना मिळत असल्याची माहिती तपासातून उघड झाली होती.

Tops security case MMRDA Commissioner R A Rajeev ed issues summons

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

French Open Women's Champion: 19 वर्षीय मीराचा इतिहास! फ्रेंच ओपन जिंकत केला असा पराक्रम, जो अनेक दिग्गजांनाही जमला नाही

Latest Marathi News Live Update : राष्ट्रीय पुरस्कार विजेते मल्याळम अभिनेते सलीम कुमार यांचे वयाच्या ५६ व्या वर्षी निधन

बॉलिवूड गाजवणाऱ्या माधुरीनं अमिताभ बच्चन यांच्यासोबत का काम केलं नाही? हे होतं कारण

निवृत्तीचं शेवटचं वर्ष, सुट्टीवरून ड्युटीवर परतण्याच्या आदल्या दिवशी जवानाने उचललं टोकाचं पाऊल

Akola : पतीला पाठीवर घेऊन उपचारासाठी धावाधाव, नर्सपासून डॉक्टरांपर्यंत विनवण्या; कुणीच मदत केली नाही, VIRAL व्हिडीओने खळबळ

SCROLL FOR NEXT