Thane Tourism esakal
मुंबई

Thane Tourism : पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! ठाणे जिल्ह्यातील 'या' पर्यटनस्थळांवर जाण्यास बंदी, तहसीलदारांचा आदेश जारी

भुशी डॅम (Bhushi Dam) परिसरात पाण्याचा प्रवाह वाढल्याने झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 5 जणांचा जीव गेला.

शर्मिला वाळुंज

सीआरपीसी कलम 144 आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 34 अन्वये हे आदेश लागू करण्यात आले आहेत.

डोंबिवली : भुशी डॅम (Bhushi Dam) परिसरात पाण्याचा प्रवाह वाढल्याने झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 5 जणांचा जीव गेला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील (Thane Tourism) पावसाळी पर्यटनस्थळांवर जिल्हा प्रशासनाने मनाई आदेश लागू केले आहेत. पावसाळ्यातील संभाव्य दुर्घटना टाळण्याच्या दृष्टिकोनातून हे आदेश लागू करण्यात आलेले आहेत.

या आदेशान्वये पर्यटकांना धबधबे (Waterfalls), नदी, धरण परिसरात जाण्यास बंदी घालण्यात आलीये. तसेच याचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील कोंडेश्वर धबधबा, भोज, दहिवली, आंबेशिव नदी, चंदेरी गड, चांदप, आस्नोली नदी, बारवी नदी, कल्याण तालुक्यातल्या कांबा, पावशेपाडा, खडवली नदी, टिटवाळा नदी, गणेश घाट, मुरबाड तालुक्यातील सिद्धगड, डोंगरन्हावे, सोनाळे.

तसेच हरिश्चंद्रगड, बारवी धरण परिसर, पडाळे धरण, माळशेज घाट, नाणेघाट , गोरखगड, भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी नदी परिसर आणि शहापूर तालुक्यातील भातसा धरण आणि परिसर, माहुली किल्ला आणि पायथा, अशोक धबधबा, आजा पर्वत, सापगाव नदी किनारा, कळंबे नदी, कसारा घाट आणि घाटातले धबधबे या पर्यटन स्थळांवर जाण्यास या आदेशानुसार पर्यटकांना मनाई करण्यात आली आहे.

सीआरपीसी कलम 144 आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 34 अन्वये हे आदेश लागू करण्यात आले आहेत. हे मनाई आदेश पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी लागू करण्यात आले असून त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती अंबरनाथच्या तहसीलदार (Ambernath Tehsildar) प्रशांती माने यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

Crude Oil: होर्मुझ तणावात भारताचा 'ऑइल मास्टरस्ट्रोक’! कच्चे तेल आणण्यासाठी नवा मार्ग; रशिया ठरला गेमचेंजर...

Latest Marathi News Live Update : विशाळगडावरील कुर्बनीला कोल्हापूर सर्किट बेंचकडून परवानगी

Koyna Dam : कोयना धरणाची पाणीपातळी खालावली; सातारा-सांगलीसह संपूर्ण राज्याची धाकधूक वाढली, 'महाजनकोची' वीजनिर्मिती बंद पडल्यास काय होणार?

Chanakya Life Guide : लोक अचानकपणे तुम्हाला इज्जत देणं का बंद करतात? तुमचं कुठं चुकतं पाहा

SCROLL FOR NEXT