Mumbai Metro  sakal
मुंबई

Mumbai Metro : मुंबईतील मेट्रो ३ च्या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी फुटणार...

लवकर वाहतूक प्रभावित ४ रस्ते खुले होणार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी करून मुंबईकरांचा प्रवासाचा वेग वाढावा यासाठी मुंबई अनेक मेट्रो मार्गाचे काम सुरु आहे. मुंबईकरांसाठी राज्य सरकारचा मेट्रो ३ या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम सुरु आहे.

या कामामुळे मुंबईतील अनेक रस्ते कमी जागेत वाहतुकीसाठी खुले असल्याने वाहनचालकांना अडथळ्यांचा सामना करावा लागतो आहे. मात्र लवकरच या वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे. भूमिगत मेट्रो ३चे ८४.३% काम पूर्ण झाले आहे.

कुलाबा- सिप्झ या भूमिगत मेट्रो मार्ग ३च्या कामामुळे वाहनचालक, बसचालक आणि स्थानिक लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेट्रो ३च्या कामासाठी बीकेसी आणि सिप्झ दरम्यानचे सर्व रस्ते जानेवारी २०२४पर्यंत पूर्ववत केले जाणार आहेत.

मात्र, ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान चार सर्वाधिक वाहतूक प्रभावित रस्ते वाहतुकीसाठी पूर्ववत केले जातील. मेट्रो ३च्या पहिल्या टप्प्यात समाविष्ट असलेल्या आरे ते बीकेसी मार्गामध्ये १० स्थानके आहेत, त्यापैकी ९ भूमिगत स्थानके आहेत. हा प्रकल्प मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल)द्वारे राबविण्यात येत आहे.

२०१६मध्ये काम सुरू झाले

सप्टेंबर २०१६ मध्ये स्थानक आणि भुयारीकरच्या कामासाठी रस्त्यावर बॅरिकेटिंग करण्यात आले होते. परंतु यामुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागला. परंतु ३० ऑगस्ट रोजी, एमएमआरसीएलने बीकेसी आणि सिप्झ मधील दहा ठिकाणी ३०,२४४ चौरस मीटर रस्ते पूर्ववत केले आहेत.

सद्यस्थितीत, मेट्रो ३चे एकूण ८४.३ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यापैकी एकूण नागरी काम ९४.९टक्के, एकूण कार्यप्रणाली ५७.९ टक्के, एकूण स्थानक बांधकाम ९२ टक्के, भुयारीकरण १०० टक्के, डेपो ७४.४ टक्के आणि मेन लाइन ट्रॅक ६८.४ टक्के इतकी कामे पूर्ण झाली आहेत.

टप्पा १ - ९१%

स्थानक आणि भुयारीकरण - ९८.३%

प्रणाली कार्य - ७२.५%

स्थानक बांधकाम - ९५%

मेन लाइन ट्रॅक - ९९%

OCS काम - ६४.२ %

टप्पा २ - ७९%

स्थानक आणि भुयारीकरण - ९६.२%

प्रणाली कार्य - ४७.१%

स्थानक बांधकाम. - ९०.५%

मेन लाइन ट्रॅक - ५०.९%

OCS काम - ४७.६%

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Income Tax Department: तीन महिने काम अन् तीन महिने घरी थांब; आयकर विभागाचे अफलातून कंत्राटी धोरण, कर्मचारी जगताहेत आश्‍वासनाचा ‘श्‍वास’ घेऊन

‘रा वन’ पुन्हा जिवंत होणार? शाहरुख खानने दिला सीक्वेलचा हिंट

Latest Marathi News Live Update : सरकारकडे सर्व माहिती कर्जमाफीची वाट कसली पाहताय : उद्धव ठाकरे

November 2025 Travel: जयपूर ते वाराणसी; या महिन्यात भारतातील 5 अद्भूत ठिकाणांना द्या भेट

Pune Smart Toilet : पुणे मनपाचा नवा प्रयोग; फिनिक्स मॉलजवळ शहरातले पहिले AC 'स्मार्ट टॉयलेट' सुरू, महापालिकेला खर्च नाही

SCROLL FOR NEXT