मुंबई

नेटकऱ्यांचा मराठी लिखाणाकडे वाढता कल 

उत्कर्षा पाटील

मुंबई - युनिकोड आणि फॉनेटिक कीबोर्डमुळे संगणकावर मराठी टाईप करणे सुलभ झाले आहे. त्यामुळे मराठीत लेखन करणाऱ्या नेटकऱ्यांच्या संख्येत दोन वर्षांत मोठी वाढ झाली आहे. विकिपीडियावरील वर्षभरात 2000 मराठी लेखांची भर पडली असून, आज 52 हजार 899 लेख उपलब्ध आहेत. दिवसभरात सरासरी 10 लेख अपलोड होतात. फेसबुक, ट्विटवर आणि ब्लॉगवर मराठीत लिहिण्याकडे कल वाढला आहे. 

फॉनेटिक कीबोर्डमुळे मराठी भाषकांना इंटरनेटवर लिहिणे सोपे झाले आहे. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स), ऑटो ट्रान्सलेशन आदी सुविधा उपयुक्त ठरल्या आहेत. विकिपीडियावर फॉनेटिक कीबोर्ड सुविधा उपलब्ध आहे. वर्षभरात नवे 2000 लेख प्रसिद्ध झाले आहेत, अशी माहिती विकिपीडियाचे अध्यक्ष आणि माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ राहुल देशमुख यांनी दिली. पूर्वी इन्स्क्रिप्ट कीबोर्डचा वापर मोठ्या प्रमाणात होत होता. फोनेटिक अधिक सुलभ असल्याने इन्स्क्रिप्टचा वापर कमी झाला आहे असे त्यांनी सांगितले. कधी कधी मात्र फोनेटिकला मर्यादा पडतात; अशा वेळी इन्स्क्रिप्ट हा सर्वोत्तम पर्याय ठरतो, असेही ते म्हणाले. 

पूर्वी मराठी लिहिण्यासाठी वेगवेगळे फॉंट होते. ते फॉंट असलेल्या व्यक्तीलाच संबंधित मजकूर वाचता येत असे. युनिकोडमुळे आपण संकलित केलेली माहिती कोणत्याही उपकरणावर तसेच संकेतस्थळावर आणि ब्राऊझरवर सहज पाहू शकतो. युनिकोडमुळे फॉंटच्या चौकटीत अडकलेली मराठी मुक्त झाली. त्यामुळेही नेटकऱ्यांमध्ये मराठीचा वापर वाढला आहे असे देशमुख म्हणाले. 

मराठीचा वापर वाढावा म्हणून लॅंग्वेज कॉम्प्युटिंग, मशीन ट्रान्सलेटर, आर्टिफिशियल इंटेजिन्स या तीन तंत्रज्ञानांचा एकत्र वापर करण्यात आला. मशीन ट्रान्सलेटरमुळे गद्य मजकुराचे शब्दशः भाषांतर होते; मात्र पद्याच्या अनुवादावर मर्यादा येतात. भाषांतर जास्तीत जास्त अचूक होण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत होते. मराठीत मौखिक सूचनांचे सॉफ्टवेअर लवकरच येईल. "व्हॉईस टू टेक्‍स्ट' परिवर्तनाचा वापर वाढत असला, तरी सध्या अचूकतेचे प्रमाण कमी आहे. जसजसा वापर वाढेल तसतशी अचूकता येईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

"कोरा'वर काटेकोर 
"कोरा' या मंचावर विविध विषयांवर मराठीत साधक-बाधक चर्चा सुरू असते. वापरकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना तज्ज्ञांकडून उत्तरे मिळतात. दिवसाला सरासरी 100 प्रश्‍नोत्तरे असे या संवादाचे प्रमाण आहे. "कोरा'वर जास्तीत जास्त अचूक मराठीत उत्तर देण्यावर भर दिला जातो. मराठी लेखनात चुका असल्यास संपादन आणि सुधारणेचा पर्याय उपलब्ध आहे. काटेकोर मराठी लिहिण्याचे प्रमाण वाढत असल्याने "कोरा' लोक्रप्रिय होत आहे.

'सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; देशपांडेने दुसऱ्याच षटकात दिले दोन धक्के

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT