everest
everest 
मुंबई

मिशन शौर्यमधील आदिवासी विद्यार्थ्यांकडून एव्हरेस्ट सर

सकाळवृत्तसेवा

मुंबई : आदिवासी विकास विभागात 'आकांक्षापुढे जिथे गगन ठेंगणे' या काव्य ओळींची आठवण यावी असे धाडस करण्यात आज चार आदिवासी विद्यार्थी यशस्वी ठरले. जगातील गिर्यारोहकांना भुरळ पाडणारा माउंट एव्हरेस्ट सर करण्यात आज मनीषा धुर्वे, प्रमेश आळे, उमाकांत मडवी, कविदास कातमोडे हे यशस्वी ठरले आहेत.

एकात्मिक आदिवासी प्रकल्प चंद्रपुर, जिल्हा प्रशासन चंद्रपुर आणि आदिवासी विकास विभागाने आदिवासी विद्यार्थ्यांतील नैसर्गिक काटक व धाडसीपणाला साद घालत मिशन शौर्यची आखणी केली. प्रधानसचिव मनिषा वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हा वेगळा उपक्रम पहिल्यांदाच विभागातर्फे राबविण्यात आला.

मनीषा धुर्वे, प्रमेश आळे, उमाकांत मडवी, कविदास कातमोडे, आकाश मडवी, आकाश अत्राम, शुभम पेंदोर, विकास सोयाम, इंदू कन्नाके, छाया आत्राम हे सर्व चंद्रपूर जिल्ह्यातील बोरडा, देवडा जिवती ब्लॉक्स मधील आदिवासी कुटुंबांतील मुले-मुली आदिवासी विकास विभागाच्या वतीने  गेल्या महिन्यात मिशन शौर्यवर निघाले होते.

जुलै 2017 पासून या विद्यार्थ्यांचे  प्रशिक्षण सुरु झाले. दार्जिलींग, लेह-लडाख या ठिकाणी या मुलांना गिर्यारोहणाचे प्रशिक्षण देण्यात आले. गेल्या महिन्यात 11 एप्रिल रोजी हे विद्यार्थी मुबंईवरुन काठमांडुला रवाना झाले होते.

मोहिमेवर जाण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी. विद्यासागरराव यांच्यासह आदिवासी विकास मंत्री विष्णु सवरा यांनी या विद्यार्थ्यांना भेटून प्रेरणात्मक शुभेच्छा दिल्या होत्या. या मोहिमेच्या या अंतिम टप्प्यासाठी त्यांच्याबरोबर सपोर्ट स्टाफ व व्यवस्थापकांबरोबरच 15 शेरपा, एक हाय अल्टीट्युड तज्ज्ञ डॉक्टर सहभागी झाले होते. या मोहिमेतील अन्य विकास सोयाम व इंदु कन्हाके हे ही लवकरच लक्ष्य गाठतील व अन्य विद्यार्थ्यांची चढाई सुरू असुन लवकरच तेही एव्हरेस्ट सर करतील.

आदिवासी विकास विभागाच्या इतिहासातील हा सोनेरी क्षण- मंत्री विष्णु सवरा

आदिवासी विकास विभागाच्या वतीने मिशन शौर्य या मोहिमेत भारताचा झेंडा एव्हरेस्टवर लावण्यात आदिवासी विद्यार्थी विद्यार्थीनी यशस्वी ठरले आहेत. आदिवासी विकास विभागाच्या इतिहासातील हा सोनेरी क्षण असल्याचे मंत्री विष्णुग सवरा यांनी सांगितले. या चारही जणांचे अभिनंदन सावरा यांनी केले.

तर विभागातर्फे राबविण्यात आलेला हे पहिलेच धाडसी मिशन होते, यामध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे नक्कीच प्रेरणादायी आहे. भविष्यातही आदिवासी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतील. मिशन शौर्यशी निगडीत प्रत्येकाचे हे यश असल्याचे आदिवासी विकास विभागाच्या प्रधानसचिव मनिषा वर्मा यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT