Closed pump due to lack of petrol availability. In the second photo, the crowd at the petrol pump.
Closed pump due to lack of petrol availability. In the second photo, the crowd at the petrol pump. esakal
मुंबई

Mumbai: ट्रक चालकांचा संप मागे, मात्र मुंबईत पेट्रोलचा तुटवडा कायम

सकाळ डिजिटल टीम

ट्रक चालकांनी संप मागे घेतला असला तरी,अजूनपर्यत इंधन पुरवठा पूर्ववत झालेला नाहीत. विरार- नालासोपारासह अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेल टँकर आल्या नसल्याने गुरुवारी विद्यार्थ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने स्कुल बसेससाठी आवश्यक इंधनाचा तात्काळ पुरवठा उपलब्ध करू द्यावा अशी मागणी स्कूल बस मालक संघटनेकडून करण्यात आली आहेत.

केंद्र सरकारने नव्या मोटर वाहन कायद्याअंतर्गत 'हिट ॲण्ड रन' कायद्यात बदल केल्यानंतर देशभरात वाहन चालकांनी सोमवारपासून संप पुकारला आहे.त्यामुळे सर्वत्र मुंबईत अवजड वाहने जागच्या जागी उभी ठेवण्यात आली आहे. संपामुळे मुंबईत मंगळवारी पेट्रोल, डिझेल, गॅस या इंधनासह जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे.

मात्र, मंगळवारी रात्री उशिरापर्यंत केंद्र शासणाबरोबर चर्चा करून मालवाहतूकदारांनी संप मागे घेतला आहे. परंतु, अनेक पेट्रोल पंपवर बुधवारी सकाळी इंधन पुरवठा करणाऱ्या गाड्या दाखल झाल्या नव्हत्या. त्यामुळे सकाळी बाहेर पडलेल्या नोकरदारांना पेट्रोल आणि डिझेल तुटवड्याचा फटका बसला. दुपारनंतर स्थिती सुरळीत होईल अशी अपेक्षा होती. मात्र, विरार, नालासोपारासह अनेक ठिकाणी इंधनाचा पुरविठा झाला नाहीत.

फक्त चार हजार बसेस रस्त्यावर

संप मागे घेतल्यानंतर बुधवारी मुंबईतील ८ हजार स्कूल बसेसपैकी ४ हजार बसेस सुरु होत्या. मुंबईतील अनेक पेट्रोल पंपावर बुधवारी सकाळपासून वाहनचालकांची वाहनामध्ये पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी गर्दी केली होती. वाहनांच्या या रांगेत शालेय बसही उभ्या होत्या. मात्र, इंधनाचा तुडवा असल्याने अनेक पेट्रोल पंपावर १ हजार रुपयांपेक्षा जास्त इंधन देत नव्हते. त्यामुळे बुधवारी चार हजार स्कुल बस बंद होत्या.

कारवाई अगोदर इंधन द्या

मालवाहतूकदारांनी संप मागे घेतल्यानंतर शासनाने स्कुल बसेस सुरू करण्याचे आदेश दिले आहे. अन्यथा कारवाई करू अशी चेतावणी सुद्धा बस मालकांना दिली आहे. परंतु, विरार आणि नालासोपाऱ्यामधील अनेक पेट्रोल पंपावर बुधवारी रात्री पर्यत इंधन मिळालेले नाहीत. त्यामुळे शासनाने कारवाई करण्याचा आदेश देण्याऐवजी इंधन स्कुल बस चालकांना इंधन पुरवठा उपलब्ध करू द्या, त्यानंतर कारवाईचे आदेश द्यावेत. असे मत स्कूल बस मालक संघटनेचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केले आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Paresh Rawal: "मतदान न करणाऱ्यांचे टॅक्स वाढवा.."; परेश रावल यांनी केली शिक्षेची मागणी

RCB vs CSK: चेन्नईला पराभूत झालेलं पाहताच दिग्गज क्रिकेटरचे पाणावले डोळे, Video होतोय व्हायरल

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Apple News : ॲपल कंपनीने नाकारले १७ लाख ऍप ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT