Mumbai Crime: मुंबई महापालिकेत नोकरीचे भुलथापाच; केली लाखोंची फसवणूक!

Fraud news
Fraud news esakal

महापालिकेमध्ये नोकरी लावण्याच्या प्रलोभनाने एका महिलेची १२ लाखांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अतुल राठोड ऊर्फ ईश्वर देविदास रुढे आणि त्याचा साथीदार सचिन तुकाराम खरडे या आरोपींविरुद्ध मालाड पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून तपास सुरू करण्यात आला आहे. आरोपींनी या महिलेसह दोघांची फसवणूक केल्याची माहिती मिळत आहे.

Fraud news
Mumbai Crime: मोठ्या भावाची लहान भावांकडून हत्या

या प्रकरणातील ४७ वर्षीय तक्रारदार महिला मालाड परिसरात वास्तव्यास आहे. तिची डिसेंबर २०२१ मध्ये आरोपी अतुल राठोडशी ओळख झाली होती. यानंतर आरोपीने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात महिलेला मुंबई महापालिकेत चांगली ओळख असून तिच्या मुलाला महापालिकेमध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. महिलेचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपीने एका तरुणाला नोकरी दिल्याचे बनावट कागदपत्र दाखविले होते.

तिने त्या प्रलोभनाला बळी पडत मुलाला नोकरी मिळवून देण्याची विनंती केली. आरोपीने नोकरीसाठी खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले. या कामासाठी महिलेने आरोपीला त्याला १२ लाख रुपये दिले. रक्कम दिल्यानंतर काही दिवसांनी आरोपीने बनावट नियुक्तीपत्र दिले होते. त्यावर पालिकेच्या स्टॅम्पसह प्रशासकीय अधिकाऱ्याची स्वाक्षरी होती; मात्र पत्र मिळूनही नोकरीवर रुजू करण्यात आले नाही. त्यामुळे महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

Fraud news
Ahmednagar Crime : शरद पवारांच्या कार्यक्रमाहून परतताना काँग्रेसच्या शिर्डी शहराध्यक्षावर हल्ला; अहमदनगर जिल्ह्यात खळबळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com