रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा
मुंबई : एका शॉपिंगच्या वेबसाईटवरुन (Shopping website) पाठवलेल्या ७.५ लाखाच्या लॉटरीच्या अमिषानं (Lottery decoy fraud) मुंबईतील एका ६० वर्षांच्या महिलेला १२ लाख ५० हजार रुपयांना फसवण्यात (twelve lac rupees money fraud) आल्याचा प्रकार मुंबईत घडला आहे. गीता पडवळ असं फसवणूक झालेल्या महिलेचं नाव असून नापतोल या शॉपिंग वेबसाईटकडून (Naaptol shopping website) त्यांना लॉटरी लागल्याचं पत्र पाठवण्यात आलं होतं. निवृत्तीनंतर मिळालेले सगळे पैसे त्यांना लॉटरीच्या आमिषात गमवावे लागले. (Twelve lac rupees money fraud of retired bank manager in Mumbai)
गीता पडवळ या निवृत्त बँक अधिकारी आहेत. गेल्या वर्षीच त्या बँक ऑफ इंडीयाच्या चीफ मॅनेजर पदावरुन निवृत्त झाल्या होत्या. त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांना मोठी रक्कम मिळाली होती. काही दिवसांपूर्वी त्यांच्या बँकेच्या पत्यावर त्यांच्यासाठी एक पत्र आलं, बँकेतून ते त्यांच्या घरी पाठवण्यात आलं. ते पत्र नापतोल या शॉपिंग वेबसाईटकडून पाठवण्यात आलं होतं, त्यात एक कार्ड स्क्रँच करायला सांगितलं होतं ते स्क्रॅच केल्यावर त्यांना समजलं की नापतोलच्या १२ व्या वाढदिवसानिमित्त काढलेल्या लॉटरीत त्यांचा नंबर लागला असून त्यांनी लॉटरीचे ७ लाख ५० हजार रुपये जिंकले आहेत.
त्यानंतर त्यांनी पत्रात दिलेल्या नंबरवर फोन केला, तेव्हाही त्यांना तुम्ही लॉटरी जिंकली आहे असं सांगण्यात आलं. पैसे ट्रान्सफर करण्यासाठी गिता पडवळ यांनी त्या व्यक्तीला त्यांचा अकाऊंट नंबर आणि आयएफएसी कोड पाठवला, त्या अकाउंटमध्ये काहीही पैसे नव्हते, तेव्हा त्यांना पुन्हा फोन आला, आणि सांगितलं की पैसे अकाऊंटला ट्रान्सफर करण्यासाठी आधी तुम्हाला त्यावर लागणाऱ्या १.१ टक्के टँक्सची रक्कम म्हणजे ८२५० रुपये भरावे लागतील, गिता पडवळ यांनी ती रक्कम गुगल पेवरुन एका मोबाईल नंबरवर पाठवली.
त्यानंतर जीएसटी, लेट फी, प्रोसेसिंग फी अशी वेगवेगळी कारणं सांगत त्या व्यक्तीनं गिता पडवळ यांच्याकडून जवळपास १२ लाख ५० हजार रुपये वेगवेगळ्या अकाऊंटवर ट्रान्सफर करुन घेतले. त्यानंतर त्या व्यक्तीनं कॉल केलेले सगळे नंबर बंद केले, त्याच्याशी कोणताही संपर्क होत नसल्यानं आपली फसवणूक झाली असं गिता पडवळ यांच्या लक्षात आलं. त्यांनी मालाड पोलिस स्टेशनला तक्रा दाखल केली. या तक्रारीलरुन अज्ञात व्यक्तीच्या विरोधात भा द विच्या कलम ४०६, ४२९, ४२० तसंच माहीती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६ (क), ६६(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.