Money fraud sakal media
मुंबई

मुंबई : एटीएम कार्ड क्लोनिंग करुन पैसे काढणाऱ्या दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा

रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : क्लोनिंग केलेल्या एटीएम कार्ड्समधून पैसे काढणाऱ्या (ATM money fraud) आणि खोटी नंबरप्लेट असलेली दुचाकी (fake rto numbers bike) वापरणाऱ्या दोन व्यक्तींना मुंबई पोलिसांनी (Mumbai police) अटक (two culprit arrested) केली आहे. जोगेश्वरी (jogeshwari) परिसरात संशयास्पदरीत्या फिरताना पोलिसांनी दोघांना अटक केली. (Two culprit arrested by Mumbai police in ATM money fraud case)

ओशिवारा पोलीस स्टेशनचे गुन्हा प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक तुषार सावंत आणि त्यांची टीम पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत असताना ओशिवारा लिंक रोड परिसरात दुचाकीवरुन येणाऱ्या दोन व्यक्ती या संशयास्पद दिसल्यानं त्यांना थांबवलं. तेव्हा त्यांनी दुचाकी न थांबवता पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत दोघांनाही पकडलं आणि गाडीच्या कागदपत्रांची चौकशी केली. त्यावेळी त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली.

पोलीस दोघांनाही पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि त्यांची झडती घेतली तेव्हा पोलिसांना 12 क्लोन केलेले वेगवेगळे एटीएम कार्डस, तसंच भंक ऑफ इंडीयाच्या 6 मिनी स्टेटमेंटच्या पावत्या, 3 मोबाईल फोन असा मुद्देमाल मिळाला आणि 2 हजार रुपये रोख रक्कम मिळाली. दोघंही चालवत असलेली गाडीही चोरीची असल्याचं आणि गाडीची नंबर प्लेट आणि रंग बनावट असल्यांचं पोलिसांच्या तपासात समोर आलं. या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

मोहम्मद इमरान मेहमुद खान (50 वर्ष), आणि इस्माईल अब्दुल रझाक कुरेशी (35वर्ष) अशी दोघांची नावं आहेत. त्यांच्यावर भा द वी कलम 420, 465, 468, 471 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनी या क्लोन केलेल्या कार्ड्समधून नक्की किती रक्कम काढली ? तसंच ते वापरत असलेली दुचाकी कुणाची आहे ? याचा पोलीस तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Drone Delivery Service: दूध, किराणा, पॅकेजेस… सगळं थेट ड्रोनने घरी पोहोचणार! मुंबईत पहिली निवासी ड्रोन डिलिव्हरी सेवा सुरू होणार, पण कधी?

Property Tax : नियमीत करदात्यांना २५ टक्के सवलत द्या; अभय योजनेतून तीन दिवसात १५.२७ कोटी वसूल

Pune Water Supply Close : पुणे शहराच्या बहुतांश भागाचा पाणी पुरवठा गुरूवारी राहणार बंद

Deglur Nagarparishad Election : नगराध्यक्षपदासाठी ११ उमेदवारी अर्ज; तर नगरसेवकपदासाठी १८९ जणांचा अर्ज

SCROLL FOR NEXT