Vaccination Sakal
मुंबई

मुंबईत दोन दिवस लसीकरण राहणार बंद

लशींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप योग्य निर्णय घेवून मुंबईकर नागरिकांना सातत्याने अवगत करण्यात येते.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - कोविड-19 (Covid-19) प्रतिबंध लसीकरण (Vaccination) मोहिमेतंर्गत पुरेसा लससाठा (Vaccine) उपलब्ध नसल्यामुळे मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal) क्षेत्रातील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर उद्या गुरुवारी 19 आणि शुक्रवारी 20 ऑगस्ट या दिवशी लसीकरण बंद राहणार आहे.

दरम्यान, बुधवारी ही बर्‍याच लसीकरण केंद्रांवर लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. लसीची उपलब्धता नसल्याने मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर लसीकरण होणार नाही.

कोरोनापासून बचाव करण्यासाठी लस घेणे आवश्यक आहे पण, आतापर्यंत अनेकदा मुंबईतील लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे. त्यातुन मुंबईकरांची गैरसोय होते. आजही बर्‍याच ठिकाणी लसीकरण बंद असल्याने लोकांनी रांग लावूनही डोस मिळत नाही. त्यामुळे नागरिकांमध्येही संतापाचे वातावरण आहे. दरम्यान, पालिकेला अद्याप तरी लसीचा साठा उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लशींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप योग्य निर्णय घेवून मुंबईकर नागरिकांना सातत्याने अवगत करण्यात येते. लस साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT