Two members of the same family died due to land slide in Vasai 
मुंबई

वसईतील कुटुंबावर काळाचा घाला; दरड कोसळून एकाच कुटूंबातील दोघांचा मृत्यू

वसईत हळहळ; दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात यश

प्रसाद जोशी

वसई - वसईच्या भोयदापाडा राजवली याठिकाणी (ता. 13) सकाळच्या सुमारास अचानक डोंगराचा काही भाग घरावर कोसळल्याने 4 जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यातील दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. तर दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. जखमींना वसईच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुटूंबावर दुःखाचे डोंगर कोसळल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

वसई पूर्वेकडील राजावली वाघरळपाडा येथे अचानक दरड घरावर कोसळली यात वंदना अमित ठाकूर (33), ओम ठाकूर (10). अमित ठाकूर (35), रोशनी ठाकूर (14). हे चौघे बुधवारी सकाळी डोंगावरून भुत्खलन होऊन दगड मातीने घर दबले गेले यात राहणारे कुटूंबातील सदस्य ढिगाऱ्याखाली सापडले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी पारयचा वापर करत दगड , माती बाजूला करून वंदना व दहा वर्षीय ओम या दोघांना सुखरूप सुखरूप बाहेर काढले. जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. तर एनडीआरएफचे पथक, श्वान पथक अग्निशमन दलाच्या मदतीला आले व त्यांनी अमित व चौदा वर्षीय रोशनी यांचा शोध सुरूच असतांना त्यांना देखील बाहेर काढण्यात आले असले तरी मात्र त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

पुन्हा अनधिकृत बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर

वसईच्या राजावली भागात भुत्खलन झाले त्या ठिकाणी अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट आहे अनेक चाळी उभ्या राहिल्या आहेत, वसई विरार शहरात अशाच प्रकारे अनधिकृत चाळी , इमारतींचे पेव फुटले आहे परंतु स्थानिक प्रशासनाकडून कारवाई केली जात नाही. पावसाळ्यात अचानक दरड कोसळून झालेल्या घटनेनंतर पुन्हा एकदा अनधिकृत बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भेसळयुक्त तूप तयार करणाऱ्या आणि त्याचे पॅकेजिंग करणाऱ्या एका संशयास्पद युनिटवर छापा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

Video: संपूर्ण 'वंदे मातरम्' गायनावर सोनिया गांधींनी खरंच आक्षेप घेतला होता का? नेमकं काय घडलं? काँग्रेसचं स्पष्टीकरण

महिलांविषयीचा 'तो' प्रश्न आणि स्पर्धकाने खेळ सोडला; बरोबर उत्तराने मिळाले असते ५० लाख; तुम्हाला येतंय का उत्तर?

SCROLL FOR NEXT