Ulhas River Sakal
मुंबई

Dombivali News : उल्हास नदीत दोन जण बुडाले; अग्निशमन दलाचे शोधकार्य सुरू

उल्हास नदीवर कपडे धुण्यासाठी काही तरुण शुक्रवारी गेले होते.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - उल्हास नदीवर कपडे धुण्यासाठी काही तरुण शुक्रवारी गेले होते. त्यातील एक जण नदीच्या पात्रात पोहण्यासाठी उतरला मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. त्याला वाचविण्यासाठी दुसऱ्या तरुणाने नदीत उडी मारली. मात्र पाण्याचा प्रवाहचा अंदाज न आल्याने दोघे ही नदीत वाहून गेल्याची घटना घडली आहे. खडकपाडा पोलीस व कल्याण अग्निशमन दलाकडून तरुणांचे शोधकार्य सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणजवळील मोहने परिसरातील उल्हास नदीवर दोघे तरुण कपडे धुण्यासाठी आणि आंघोळीसाठी गेले होते. यामधील एक तरुण नदीत पोहण्यासाठी उतरला. तो बुडू लागल्याने त्याला वाचविण्यासाठी दुसरा तरुण नदीत उतरला. मात्र पाण्याच्या प्रवाह असल्याने दोघेही नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले.

उल्हासनगरच्या शांतीनगर परिसरात राहणारे सलमान अन्सारी आणि सरफराज अन्सारी हे दोघे कपडे धुण्यासाठी आणि अंघोळीसाठी उल्हास नदीवर गेले होते. हे दोघे नातेवाईक होते. सर्फराज हा उल्हास नदीत पोहण्यासाठी उतरला होता. त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. हे पाहताच सलमानने नदीत उडी घेत त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघे ही पाण्यात बुडाले.

सलमान अन्सारी आणि सरफराज अन्सारी असे बुडालेल्या दोघांची नावे आहेत. आज दुपारच्या सुमारस ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच कल्याण अग्निशमन विभाग आणि खडकपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाने तात्काळ शोधकार्य सुरू केले आहे. गावकऱ्यांच्या मदतीने सध्या नदीत शोधकार्य सुरू आहेत. घटनास्थळावर मुलांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दंड की चेष्टा? BMC अधिकाऱ्यांना हायकोर्टानं ठोठावला ११ रुपयांचा दंड, २ दिवसाची दिलीय मुदत; प्रकरण काय?

Kolhapur Prisedant : पहिल्या अध्यक्षपदासाठी भाजप आग्रही; सव्वा वर्षाचा कालावधी, महायुतीतील सर्वच घटक पक्षांना मिळणार संधी

UPI Transaction : UPI लिमिटमुळे पेमेंट फेल? जाणून घ्या कशी वाढवायची व्यवहार मर्यादा

घराबाहेर येताच ओमकार आणि आयुषमध्ये हाणामारी, नॉमिनेट का केलं? म्हणत ओमकार धावून गेला आयुषच्या अंगावर, Viral Video

8th Pay Commission च्या नावाखाली मोठी फसवणूक; चुकूनही डाउनलोड करू नका 'हे' नवीन अ‍ॅप, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा

SCROLL FOR NEXT