thane police
thane police sakal
मुंबई

ठाणे : पाण्याची टाकी साफ करताना दोन कामगारांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : ठाण्यातील मध्यवर्ती भागातील हरिनिवास परिसरातील इमारतीच्या पाण्याची टाकी स्वच्छ करण्यासाठी टाकीत उतरलेल्या दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. तर, अन्य दोघांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

विवेक कुमार (३०) आणि योगेश नरवनकर (३८) अशी मृतांची नावे आहेत. नौपाडा येथील हरिनिवास चौक येथे एका संस्थेची इमारत आहे. या संस्थेने इमारतीच्या छतावर असलेल्या तीन पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्याचे कंत्राट एका कंपनीला दिले होते. या कंपनीमध्ये विवेक कुमार, योगेश नरवनकर, गणेश नरवनकर आणि मिथुन ओझा हे काम करत होते. रविवारी दुपारी हे चौघेही तरुण एका टाकीत उतरले. तसेच त्यांनी एक रासायनिक पदार्थ त्यामध्ये सोडले. या रासायनिक पदार्थामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.

या घटनेची माहिती संस्थेच्या सभासदांनी नौपाडा पोलिसांना दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या पथकाने आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने चारही कामगारांना बाहेर काढले. परंतु यातील विवेक आणि योगेश या दोघांचाही मृत्यू झाला होता. तर गणेश आणि मिथुन या दोघांना उपचारासाठी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

SCROLL FOR NEXT