Dr. Shrikant Shinde sakal
मुंबई

Ulhasnagar News: उल्हासनगरातील शिवसेना मेळाव्यात कल्याण पूर्वेतील उबाठा पदाधिकाऱ्यांचा प्रवेश; डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून स्वागत..

Ulhasnagar News: गुरुवारी उल्हासनगरात पार पडलेल्या शिवसेनेच्या तीन विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात कल्याण पूर्वेकडील उबाठा च्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

दिनेश गोगी - सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर : गुरुवारी उल्हासनगरात पार पडलेल्या शिवसेनेच्या तीन विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात कल्याण पूर्वेकडील उबाठा च्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.खासदार डॉ.श्रीकांत शिंदे,जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले आहे.

शांतीनगर मधील एका प्रशस्त सभागृहात उल्हासनगर,कल्याण पूर्व आणि अंबरनाथ या तीन विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या कामांवर प्रभावित होऊन कल्याण पूर्वेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी सत्यवान खेडेकर,अनंत आंबरे,महेंद्र एटमे,प्रकाश यादव,विकास कदम,राहुल मोरे,महेश नाईक,युवासेनेचे तन्मय एटमे यांनी समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला.

जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी पक्षाचा झेंडा देऊन प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे शिवसेना पक्षामधे स्वागत केले.खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या ऑनलाइन भाषणात सर्वांचे स्वागत करून व शुभेच्या देऊन सर्वांचा पक्षात सन्मान केला जाईल,काम करण्याची संधी देण्यात येणार असून आपण त्याच सोन कराल असा विश्वास व्यक्त केला.

याप्रसंगी जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे,चंद्रकांत बोडारे, आमदार बालाजी किणीकर,प्रवक्ते किरण सोनवणे,युवासेना जिल्हाप्रमुख जितेन पाटील,शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमाकांत देवळेकर,महिला उपजिल्हा संघटक माधुरी प्रशांत काळे,विधानसभा प्रमुख निलेश शिंदे,संपर्कप्रमुख व विधानसभा निरिक्षक प्रशांत काळे,महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी,माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी,पक्ष निरीक्षक सुभाष साळुंखे,कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड,महिला विधनसभा संघटक पल्लवी बांदिवडेकर,महिला शहर संघटक पुष्पा ठाकरे,विभागप्रमुख संतोष साळवी,शाखाप्रमुख विशाल वाघमारे,वासुदेव कदम,प्रदीप तांबे यांच्या सह तिन्ही विधानसभेतील शिवसैनिक,युवासैनिक,महिला आघाडी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले पुलाजवळ भीषण अपघात; ब्रेक फेल झालेल्या कंटेनरची वाहनांना धडक, दोघांचा मृत्यू

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण १७ वर्षे रखडले; खर्चात तब्बल ५५०० कोटींची वाढ, कोकणवासीयांचा संताप उफाळला

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT