मुंबई

Shivsena: ठाकरेंनी बालेकिल्ल्यातच शिंदेंना दिला धक्का, विश्वासू सहकारी करणार घरवापसी

Eknath shinde vs Uddhav Thackeray: एकनाथ शिंदे यांच्या एका जवळच्या नेत्याने ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Latest Maharasthra News | होम पिचवरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनी खूप मोठा धक्का दिला आहे. तो म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे त्यांचा अगदी जवळचा असणाऱ्या नेत्याला ठाकरे गटाने आपल्याकडे ओढले आहे

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीमधून शिंदे गट निवडणूक लढायला उत्सुक आहे. मात्र ही जागा भाजपला मिळणार असल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या एका जवळच्या नेत्याने ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे.

युवा सेना राज्यसचिव आणि माझी स्थायी समिती अध्यक्ष दीपेश म्हात्रे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला असून लवकरच ते ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दिपेश म्हात्रे यांच्यासोबत काही माजी नगरसेवकही ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत

दीपेश म्हात्रे खासदार श्रीकांत शिंदे यांचे अगदी विश्वासू म्हटले जायचे. मात्र डोंबिवली विधानसभा लढवण्यासाठी ते उत्सुक असल्याने त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला असून ठाकरे गटाकडून आगामी विधानसभेत डोंबिवलीची जागा ते लढवतील असे म्हटले जात आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले पुलाजवळ भीषण अपघात; ब्रेक फेल झालेल्या कंटेनरची वाहनांना धडक, दोघांचा मृत्यू

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण १७ वर्षे रखडले; खर्चात तब्बल ५५०० कोटींची वाढ, कोकणवासीयांचा संताप उफाळला

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT