Milind Narvekar 
मुंबई

Milind Narvekar: दहावी पास ते एकही वाहन नाही; ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकरांची संपत्ती किती?

UBD Milind Narvekar Property: उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेना ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही. ते दहावी पास आहेत.

कार्तिक पुजारी

मुंबई- उद्धव ठाकरे यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे मिलिंद नार्वेकर यांनी विधान परिषदेसाठी ठाकरे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे एकप्रकारचे त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली आहे. याआधी ते दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून लढण्याची शक्यता होती. शिवाय ते शिंदे गटात जातील अशीही चर्चा झाली होती. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर नार्वेकरांच्या संपत्ती किती? हे समोर आलंय.

उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेना ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही. ते दहावी पास आहेत. मिलिंद नार्वेकर यांच्याकडे रोख रक्कम 45 हजार रुपये, तर पत्नीकडे 36 हजार रुपये रोख रक्कम आहे. नार्वेकर यांच्या बँक अकाऊंटमध्ये 74 लाख 13 हजार 243 रक्कम तर पत्नीकडे 8 कोटी 22 लाख 118 रक्कम आहे.

बॉण्ड्स किंवा म्युचल फंड मध्ये गुंतवणूक - 50 हजार, तर पत्नीचे 12 कोटी 40 लाख 82 हजार 526 रुपये

पोस्ट ऑफिस अथवा इतर पॉलिसीमध्ये गुंतवणूक - 3 लाख 68 हजार 729 रुपये तर पत्नीचे 67 लाख 88 हजार 558

वैयक्तिक कर्ज - 26 लाख 38 हजार 160 रुपये कर्ज, तर पत्नीवर 3 कोटी 22 लाख 45 हजार रुपये कर्ज

बँक लोन - स्वतःवर 1 कोटी 54 लाख 81 हजार 989, पत्नीवर कर्ज 38 लाख 94 हजार 807 रुपये

वाहन - मिलिंद नार्वेकर यांच्या स्वतःच्या नावावर कोणतेही वाहन नाही

स्वतःकडे दागिने

सोनं - 355.94 ग्राम, बाजारी भाव - 24 लाख 67 हजार 981

चांदी - 12.56 किलोग्राम, बाजारी भाव - 9 लाख 74 हजार 656

हिरे - 80.93, बाजारी भाव - 36 लाख 85 हजार 552

एकूण दागिन्यांची किंमत - 71 लाख 28 हजार 189

पत्नीकडे दागिने

सोनं - 425 ग्राम, 29 लाख 26 हजार 21 रुपये

चांदी - 6.26 किलो, 4 लाख 85 हजार 776

हिरे - 90.96, 33 लाख 49 हजार 623

एकूण दागिन्याची किंमत - 67 लाख 61 हजार 420

शेयर्स - श्री बालाजी कॉम. एलएलपी 50 टक्के शेयर्स तर पत्नीचे 50 टक्के शेयर्स

स्वतःची एकूण रक्कम - 10 कोटी 11 लाख 28 हजार 152 तर, पत्नीची एकूण रक्कम - 31 कोटी 25 लाख 33 हजार 560

नार्वेकरांची जमीन कुठे-कुठे आहे?

16 जुलै 2013 रोजी गांव मुरुड तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी येथे 74.80 एकर जमीन घेतलेली आहे. यामध्ये पत्नीचा 50 टक्के हिस्सा आहे. 5 ऑगस्ट 2008 रोजी खरेदी केलेली बीड जिल्ह्यातील बाणेवाडी गावात 0.19 एकर जमीन आहे. याशिवाय बेंगलोर येथे पत्नीच्या नावावर 2325 स्क्वेअर फुट जमीन आहे. मुंबईतील मालाड आणि बोरिवली येथे 1000 स्क्वेअर फुटाचं घर नावावर आहे. पत्नीच्या नावावर अलिबाग येथे एक फार्म हाऊस आहे.

नार्वेकर यांच्या स्वतःच्या मालमत्तेची एकूण रक्कम 4 कोटी 17 लाख 63, हजार 323 आहे, तर पत्नीच्या मालमत्तेची रक्कम 11 कोटी 74 लाख 6 हजार 490 आहे. मिलिंद नार्वेकर आणि पत्नीचे उत्पन्नाचे साधन वैयक्तिक पगार, घरांचे भाडं, व्यावसायिक उत्पन्न हे आहे. मिलिंद नार्वेकर यांचे अदानी पोर्ट्स आणि स्पेशल, अंबुजा सिमेंट, अशोक लेयलँड, एसीयन पेंट्स, IDBI बँक, ICCI बँक आणि इतर कंपन्यामध्ये शेयर्स खरेदी केलेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Pune Metro: पुणेकरांना मोठा दिलासा! विमानतळाला मेट्रोची थेट जोडणी, कर्वे रस्त्यावर दुमजली उड्डाणपूल; मोहोळ यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT