pravin darekar and uddhav thackeray esakal
मुंबई

Pravin Darekar : हिंदुत्वाविषयी बोलण्याचा ठाकरे यांना अधिकार नाही

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राममंदिराबाबत केलेल्या विधानांचा आज दरेकर यांनी खरपूस समाचार घेतला.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - हिंदुवाद गुंडाळून विरोधी विचारधारा असणाऱ्या काँग्रेससोबत गेलेल्या उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व, देश-धर्माविषयी बोलण्याचा नैतिक अधिकारच गमावला आहे, अशी टीका भाजपचे विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांनी आज येथे केली.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राममंदिराबाबत केलेल्या विधानांचा आज दरेकर यांनी खरपूस समाचार घेतला. आपल्या देवदैवतांच्या बाबतीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने काय भुमिका घेतलीय हे सर्वश्रुत आहे. तर संजय राऊत हे वैफल्याने ग्रासलेले आहेत, अशी टीकाही दरेकर यांनी केली.

दरेकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींनाही लक्ष्य केले. ते म्हणाले की, राहुल गांधी निष्प्रभ आहेत, त्यांचा प्रभाव पडणार नाही. त्यांनी कितीही सभा, यात्रा घेवो, मात्र या देशातील जनतेने ठरवले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा या देशाचे नेतृत्व करावे.

कारण गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान मोदींनी ज्या उंचीवर देशाला नेले आहे ते देशाची जनता पाहत आहे. पंतप्रधान मोदींच्या तुलनेत राहुल गांधी आजूबाजूलाही पोहोचू शकत नाही एवढं उत्तुंग आणि या देशातील जनतेसाठी विश्वासार्ह नेतृत्व म्हणून पंतप्रधान मोदी आज प्रस्थापित झालेले दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता AI ठरवणार संघात कोणाला संधी मिळणार! क्रिकेटमध्ये तंत्रज्ञानाचा नवा अध्याय; आकडेवारीपासून थेट संघ निवडीसाठी वापर होणार

Raigad Shivrajyabhishek celebration: रायगडावर तिथीनुसार ३५३ वा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गडावर शिवमय वातावरण

Vat Purnima 2026: घराजवळ वडाचं झाड नाहीये? मग 'अशी' करा घरच्या घरीच वटपौर्णिमेची पूजा; जाणून घ्या सोपा उपाय

Latest Marathi News Live Update : धुळे जिल्ह्यात पावसाची दांडी; शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

राम मंदिरातील धार्मिक कार्यात असायचा सहभाग, पण मागे सुरू होतं भलतंच; टिन्नू यादवच्या कारनाम्याने अयोध्या हादरली!

SCROLL FOR NEXT