tushar bhosale esakal
मुंबई

उद्धव ठाकरें स्वार्थी 'मुख्यमंत्री' हे महाराष्ट्राचं दुर्देव - आचार्य तुषार भोसले

'आमच्या भगवाधारी साधूंना ठेचून मारलं, त्याला आता दीड वर्ष होत आलं पण...'

सकाळ वृत्तसेवा

- सुशांत सावंत

मुंबई: "ठाकरे कुटुंबावर कोणी हल्ला केला, तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अशी भाषा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी केली. महाराष्ट्रात आमच्या भगवाधारी साधूंना ठेचून मारलं, त्याला आता दीड वर्ष होत आलं पण त्यांच्या मारेकऱ्याला आजपर्यंत शिक्षा होऊ शकली नाही, साधं त्यांच्याविरोधात आरोपपत्र सुद्धा व्यवस्थित दाखल होऊ शकलं नाही" अशी टीका आचार्य तुषार भोसले (acharya tushar bhosale) यांनी केली आहे. ते भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आहेत.

"दुसरीकडे महाराष्ट्रात येऊन हिंदू समाजाला सडका म्हणणारा शर्जील उस्मानी आज मोकाट फिरतोय, त्याला कोणताही दंड केला जात नाही आणि वरून हिंदुत्वाचा आव आणता, तुमच्या ढोंगी हिंदुत्वाचा बुरखा कालच्या दसरा मेळाव्यात फाटला आहे" अशी टीका आर्चाय तुषार भोसले यांनी केली.

"एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री हा त्या राज्याचा कुटुंबप्रमुख असतो पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कुटुंब हे केवळ ठाकरे कुटुंब आहे, महाराष्ट्र हा  त्यांच्या कुटुंबाचा भाग नाही हे काल त्यांनी सिद्ध केलं. महाराष्ट्राचं हे दुर्देव आहे की इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा 'मुख्यमंत्री' उद्धव ठाकरेंच्या रूपाने महाराष्ट्राला मिळाला आहे" अशी टीका तुषार भोसले यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price India : देशात नव्याने पेट्रोल-डिझेल दर जाहीर; कुठे स्वस्त, महाग? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर

Jayakwadi Dam: मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी! जायकवाडी धरण ८० टक्के क्षमतेच्या उंबरठ्यावर; धरणात पाण्याची जोरदार आवक

MHADA: स्वप्नाच्या शहरात स्वत:चं घर! म्हाडाच्या घरांची लवकरच लॉटरी निघणार, विकसकांकडून ५,५०० घरे मिळणार; तयारी सुरू

Peru Plane Crash : पेरूमध्ये पर्यटकांचे विमान कोसळले, १३ जणांचा मृत्यू; नाझ्का लाइन्स पाहताना काळाने गाठले

Mumbai News: मुंबईवर आता सीसीटीव्हीची नजर, उघड्यावर कचरा फेकणाऱ्यांना दणका; महापालिकेचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT