Uddhav Thackeray news in marathi esakal
मुंबई

Uddhav Thackeray: "मोदी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य, इथं भांडण्यापेक्षा..." उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणावर केली भूमिका स्पष्ट!

Uddhav Thackeray on Maratha Reservation : मराठा आंदोलकांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्याच्या हातात नाही, हा प्रश्न दिल्लीत सुटू शकतो, असे ठाकरे म्हणाले.

Sandip Kapde

मराठा आंदोलकांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ठाकरे यांनी स्पष्ट केले की, “आधीचा भाजपा आणि आताचा भाजपा वेगळा आहे. मराठा आरक्षण संसदेतून दिलं पाहिजे, त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे.”

मराठा आरक्षणाचे न्यायालयीन मुद्दे-

उद्धव ठाकरे यांनी नमूद केले की, "बिहारने दिलेलं आरक्षण कोर्टाने रद्द केलं आहे आणि मराठा आरक्षण देण्याचा अधिकार राज्याला नाही." त्यांनी सांगितले की, मराठा आरक्षण देण्यासाठी केवळ केंद्र सरकारलाच अधिकार आहे आणि हे आरक्षण दिल्लीतूनच मिळू शकते. त्यामुळे इथं भांडण्यापेक्षा दिल्ली प्रश्न सोडवू.

राजकीय भूमिका आणि मराठा समाजाचा न्याय-

उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, "मी माझ्या खासदारांचा पाठिंबा द्यायला तयार आहे, सर्व पक्षांनी बसून तोडगा काढावा, माझा त्याला पूर्ण पाठिंबा आहे. मोदींनी स्पष्ट करावं की इतर जातींना दुखावयाला ते तयार आहेत का? आरक्षणाबाबत मोदी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे.”

धारावी पुनर्विकासावर ठाकरे यांची भूमिका-

उद्धव ठाकरे यांनी धारावी पुनर्विकासावर देखील आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी म्हटले की, “गेल्यावेळी मुंबईची अदाणी होऊ देणार नाही.  धारावीकरांना उचलून मुलुंड-दहिसर इथे टाकणं आम्ही होऊ देणार नाही. धारावीकरांना तिथेच घर देण्यात यावे.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT