मुंबई

Ulhasnagar News: स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील पुस्तके!

उल्हासनगर महानगरपालिकेचा कार्यक्रम; वायफाय,संगणक सुविधा

दिनेश गोगी - सकाळ वार्ताहर

Ulhasnagar News: स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उल्हासनगरातील विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील पुस्तकांचे वाटप करण्याचा आगळावेगळा कार्यक्रम महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्या हस्ते पार पडला.

महानगरपालिकेची डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका असून त्यात विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी येत असतात.याच अभ्यासिकेतून तरुण तरुणी ह्या आयएएस,पोलीस,तलाठी अशा शासकीय सेवेत रुजू झाले आहेत.विद्यमान घडीला अभ्यासिकेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी आणि स्पर्धा परीक्षेत कामी यावीत या सकारात्मक उद्देशाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावरील पुस्तकांचे वाटप आयुक्त अजीज शेख यांच्या हस्ते करण्यात आले.(ulhasnagar municipal corporation)

अजीज शेख यांनी एमपीएससी,यूपीएससी च्या विद्यार्थ्यांना र्मार्गदर्शन करून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या.तसेच विद्यार्थ्यांनी केलेल्या माणगीनुसार त्यांना मासिके,वर्तमानपत्र,संगणक व वायफाय सुविधा देण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी महापालिका सचिव प्राजक्ता कुलकर्णी,जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे,सिस्टीम अनालिस्ट श्रद्धा बाविस्कर,भांडार विभाग प्रमुख अंकुश कदम आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी रुग्णालयात जाऊन जखमींची केली विचारपूस

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT