sakal
मुंबई

Ulhasnagar News: उल्हासनगरात प्लास्टिक कारखान्यावर छापेमारीचा रात्रीचा खेळ चाले; 9 मेट्रिक टन माल जप्त

पालिका-प्लास्टिक निर्मूलन-प्रदूषण मंडळाची संयुक्तिक कारवाई,

दिनेश गोगी : सकाळ वृत्तसेवा

Ulhasnagar News: आयुक्त अजीज शेख यांच्या आदेशान्वये रात्रीच्या वेळी प्लास्टिक पिशव्यांचे मोठया प्रमाणावर उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर उल्हासनगर महानगरपालिका,प्लास्टिक निर्मूलन पथक,प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी छापेमारी केली आहे.त्यात 9 मेट्रिक टन माल जप्त करण्यात आला असून 15 हजाराचा दंड वसूल केला गेला आहे.

अतिरिक्त जमीर लेंगरेकर यांना रात्रीच्या सुमारास महादेव कंपाऊंड मध्ये एस.के.प्लास्टिक नामक कारखान्यात प्लास्टिक पिशव्यांचे उत्पादन करण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार आयुक्त अजिज शेख यांच्या आदेशान्वये महापालिकेचे आरोग्य विभाग प्रमुख मनीष हिवरे,मुख्य स्वच्छता निरीक्षक एकनाथ पवार,विनोद केणे व प्लास्टिक निर्मूलन पथक प्रमुख जितेंद्र राठी,प्रदूषण नियंत्रण मंडळाचे भूपेंद्र कुलकर्णी,उप प्रादेशिक अधिकारी राजेश नांदगावकर,क्षेत्र अधिकारी अनिरुद्ध वराळे यांनी 10 तारखेच्या रात्री संयुक्तिकरित्या छापेमारी केली.

उत्पादन करण्याऱ्या कारखान्याची तपासणी केली असता ईपीआर नंबरशिवाय पॅकेजींग पिशव्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू होते.या पॅकेजिंग पिशव्यांची इतर शहरातही विक्री करण्यात येत असल्याचे कारखानदार यांच्याकडे केलेल्या चौकशीत आढळून आले.यावेळेस जवळपास 9 मेट्रिक टन माल जप्त्त करण्यात आला व दहा हजार रुपये दंडात्मक कार्यवाही करण्यात आली.

याव्यतिरिक्त भावजीनगर येथील गोल्डन बेकरी यांचे मालक हे बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्याचा वापर व विक्री करत असताना त्यांच्या कडून दीड किलो पिशव्या हस्तगत करून पाच हजाराचा दंड वसूल करण्यात आला.

प्रदूषण मंडळाकडून इपीआर नंबर न घेतलेल्या अशा सर्व कारखानदारांवर यापुढे सतत कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रदूषण मंडळाचे अधिकारी यांनी सूतोवाच केले आहे.व्यापाऱ्यांनी अल्प फायद्यासाठी पर्यावरणाची हानी करणारे प्लास्टिक वापरू नये व अशा प्लॅस्टिकची विक्री करू नये.

जर कोणी नियमभंग करत असल्यास नागरिकांनी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात तसे कळवल्यास कठोर कारवाई केली जाईल व संबंधितांचे माहिती देणाऱ्याचे नाव देखील गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहन अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑफिसला यायला उशीर होतो... दहिसरवरून येताना ट्राफिक लागतं, मला भायखळ्याला बंगला द्या; BMC उपमहापौरांची अश्विनी भिडेंकडे मागणी

Karad Development: आंदोलनापेक्षा विकासाचा हिशेब द्या; भाजप नगरसेवकांना इंद्रजीत भोपते यांचा सवाल, 'घोषणाबाजी नव्हे तर नियोजन महत्त्वाचे'

Latest Marathi News Live Update : बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी नागरिक कर्नाटकात; 'एसआयआर' मोहिमेदरम्यान प्रकार उघडकीस

Blue Aadhaar Card : आता घरबसल्या बनवा ५ पाच वर्षांपर्यंतच्या बाळाचं आधार कार्ड, सोपी आहे प्रक्रिया

Tamil Nadu Cow Slaughter Ban : सर्वोच्च न्यायालयाकडून तामिळनाडूतील 'विजय सरकार'ला दिलासा; गोहत्या बंदीबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती

SCROLL FOR NEXT