शहरात अनधिकृत होर्डिंगबाजी सुरूच
शहरात अनधिकृत होर्डिंगबाजी सुरूच 
मुंबई

शहरात अनधिकृत होर्डिंगबाजी सुरूच

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : पालिकेच्या आवाहनाला भीक न घालता शहरात अनधिकृत होर्डिंगबाजी सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्रिपदी तसेच कॅबिनेट मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल, दत्तजयंतीचे औचित्य तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनाच्या पार्श्‍वभूमीवर नवी मुंबईत ठिकठिकाणी विनापरवाना होर्डिंग्ज उभारण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाने अनधिकृत होर्डिंगबाजी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत; मात्र पालिकेकडून गुन्हे दाखल करतानादेखील भेदभाव केला जात असल्याचे निदर्शनास येत आहे.

आधुनिक शहर म्हणवणाऱ्या नवी मुंबईत न्यायालयाच्या आदेशाला हरताळ फासला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यात खुद्द प्रशासनाकडूनच हलगर्जीपणा केला जात असल्याने, फुकट्या होर्डिंगबाजाचे चांगलेच फावले आहे. मंत्रिपदी निवड झाल्यानंतर तसेच सण-उत्सवांचे निमित्त, येणाऱ्या पालिका निवडणुकीचे वेध घेत अनधिकृत होर्डिंगबाजीला ऊत आला आहे. विनापरवाना होर्डिंगवर कारवाई करण्यासाठी विभागस्तरावर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच महापालिकेची परवानगी न घेता होर्डिंग किंवा जाहिरात फलक लावणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश देखील दिले आहे. मात्र, पालिका अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे फुकट्या जाहिरातदारांनी आपले प्रताप सुरूच ठेवले आहेत. 

ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, वाशी, नेरूळ, बेलापूर व तुर्भे या भागात मोठ्या प्रमाणात विनापरवाना होर्डिंग लावण्यात आले आहेत. वाशी येथील अभ्युदय बॅंकेच्या समोरील चौकातही विविध पक्षाच्या शुभेच्छा देणाऱ्या होर्डिंग्जची एकच भाऊगर्दी झाल्याचे पाहावयास मिळते. त्याचप्रमाणे कोपरखैरणेतील डीमार्ट चौकात, ऐरोली स्टेशननजीक परिसरातसुद्धा मोठ्या प्रमाणात होर्डिंग्ज उभारण्यात आले आहेत. मात्र, पालिकेचे अधिकारी तसेच अतिक्रमण पथक राजकीय नेत्यांच्या बॅनरबाजीवर कारवाई करताना हात आखडता घेत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

अनधिकृतपणे बॅनरबाजी करण्यात आली असल्यास ते बॅनर हटवण्याचे आदेश विभाग कार्यालयाला देण्यात आले आहेत. अनधिकृतपणे बॅनर लावत असल्याचे आढळल्यास विभाग कार्यालयात तक्रार करावी. त्यांनतर तत्काळ 
ते बॅनर यंत्रणेकडून 
हटवण्यात येतील.
- अमरिश पटनीगिरी, उपायुक्त, अतिक्रमण विभाग, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: सुनील नारायणचं शानदार अर्धशतक; कोलकाता 100 धावा पार

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT