Uran Murder Case Yashshree Shinde news  esakal
मुंबई

Uran Murder Case : POCSO अंतर्गत तुरुंगात पाठवल्याचा ‘बदला’? दाऊद शेखवर संशयाची सुई, दोन दिवसांपासून आहे फरार...

Uran Murder Case Yashshree Shinde latest updates : यशश्री शिंदे गुरुवारी (ता. २५) दुपारी दीडच्या सुमारास मैत्रिणीच्या घरी गेली होती. तेथून पनवेल रेल्वे स्टेशनच्या दिशेने ती निघून गेली होती. सायंकाळी ४.३० नंतर तिचा फोन बंद असल्याने रात्री उशिरा उरण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

Sandip Kapde

उरणमध्ये राहणाऱ्या २० वर्षीय तरुणी यशश्री शिंदेची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री पनवेल रेल्वे स्टेशनलगतच्या झुडपामध्ये तिचा मृतदेह सापडल्यानंतर मारेकऱ्याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक कर्नाटकला रवाना झाले आहे.

यशश्री शिंदे गुरुवारी (ता. २५) दुपारी दीडच्या सुमारास मैत्रिणीच्या घरी गेली होती. तेथून पनवेल रेल्वे स्टेशनच्या दिशेने ती निघून गेली होती. सायंकाळी ४.३० नंतर तिचा फोन बंद असल्याने रात्री उशिरा उरण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांकडून बेपत्ता यशश्रीचा शोध सुरू असताना शुक्रवारी (ता. २६) सायंकाळी पनवेल रेल्वे स्थानकालगतच्या झुडपामध्ये लघुशंकेसाठी गेलेल्या एका व्यक्तीला तिचा मृतदेह आढळून आला.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि यशश्रीची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. तिच्या पाठीवर, पोटावर तसेच चेहऱ्यावर गंभीर स्वरूपाच्या जखमा आढळल्या आहेत.

दाऊद शेखवर संशयाची सुई-

पोलिसांनी दाऊद शेखच्या पार्श्वभूमीचा तपास केला असता, यशश्रीच्या परिवाराने २०१९ मध्ये त्याच्याविरुद्ध पॉक्सो अंतर्गत एफआयआर दाखल केली होती. त्या वेळी यशश्री नाबालिग होती. यशश्रीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात दाऊद शेखवर हत्या केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी सात पथके तयार केली असून तो बंगळूरला पळाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संतप्त नागरिकांचा मोर्चा-

दोन दिवस उलटूनही आरोपी फरार असल्याने उरणमधील नागरिकांमध्ये संताप पसरला आहे. संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला असून, पोलिसांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणात तरुणीवर बलात्कार झाला होता की नाही हे वैद्यकीय चाचणीनंतर समोर येईल. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी सात पथके तयार केली असून, कर्नाटकातील विविध ठिकाणी शोधमोहिम हाती घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT