Vaibhav Kesarkar
Vaibhav Kesarkar 
मुंबई

क्रिकेट खेळताना युवकाचा हृदयविकाराने मृत्यू (व्हिडिओ)

सकाळवृत्तसेवा

मुंबई: क्रिकेट खेळत असताना एका खेळाडूच्या छातीत दुखू लागले. मैदान सोडल्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. वैभव केसरकर (वय 24) असे या खेळाडूचे नाव असून, त्याच्या मृत्युमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

भांडूपमध्ये वैभव गावदेवी संघाकडून क्रिकेटचा सामना खेळत होता. या सामन्यात गावदेवी संघाने प्रथम फलंदाजी केली. वैभव जवळपास तीन षटकं फलंदाजी करत होता. यानंतर तो संघासह क्षेत्ररक्षणाला उतरला. मात्र, छातीत दुखू लागल्यामुळे त्याला त्रास होऊ लागला. याची माहिती त्याने पंचांना दिली. यानंतर त्याने मैदान सोडले. त्याच्या मित्रांनी त्याला जवळच्या भाऊसाहेब रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान वैभवचा मृत्यू झाला. वैभवच्या मृत्युमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. वैभवला सौम्य हृदयविकाराचा झटका येऊन गेला, असे डॉक्टरांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: कर्नाटकात 28 जागांपैकी आम्ही 25 जागा जिंकणार- बीएस येडियुरप्पा

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

Instagram Influencer: इन्स्टाग्रामवर केली एक चूक अन् काही क्षणातच गमवावा लागला जीव! तुम्हीही करताय का ही चूक?

SCROLL FOR NEXT