मुंबई

‘व्हॅलेंटाईन डे’ निसर्गाच्या सान्निध्यात साजरा करण्याचा ट्रेंड

सकाळवृत्तसेवा

मुंबई - चलो चले कही दूर चले... प्यार के लिये ये भीड ठिक नाही, असे म्हणत शहराच्या गर्दीतून बाहेर पडत एकातांत ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्याचा मुंबईतील प्रेमीयुगुलांचा ट्रेंड गेल्या काही वर्षांपासून वाढू लागला आहे. नवा ट्रेंड टुरिंग कंपन्यांनीही कॅश केला असून रेवदंड्याचा समुद्रकिनारा, इगतपुरीचा नदीकिनारा आणि पुण्याजवळील पवना धरण परिसरापासून बोर्डी-डहाणूच्या चिकूच्या बागेतही ‘कॅम्पिंग’ होणार आहे... हा झाला खिसा भरलेल्यांचा प्रेमदिनाचा बेत. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या आणि पॉकेटमनीवर दिवस काढणाऱ्या कुमार-कुमारींचा ‘व्हॅलेंटाईन डे’ कॉफी शॉपमध्ये गुलाब आणि टेडीबिअरच्या गिफ्टनेच पूर्ण होणार आहे.

गुरुवारी (ता. १४) प्रेम दिवस जगभरात साजरा होईल. मुंबईतल्या गर्दीत प्रेमवीरांना एकांत मिळणे कठीण झाले आहे. ज्यांचा खिसा खुळखुळतोय, अशा प्रेमींनी मुंबईबाहेर जाण्याबरोबरच पंचतारांकित हॉटेलात वाईनबरोबर सेलिब्रेशन करण्याचे प्लॅन केले आहेत. अशा युगुलांसाठी मुंबईतील काही पंचतारांकित हॉटेलांमध्ये विशेष पॅकेजही तयार करण्यात आले आहेत. एकमेकांच्या साथीत काही तास गप्पागोष्टी करण्यासाठी काही हजार मोजण्याची अनेकांची तयारी आहे. ज्यांना दिवसभर एकांत हवा आहे, त्यांनी मुंबईबाहेर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी हॉटेलऐवजी निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचा पर्याय त्यांनी निवडला आहे. ‘मुंबईत प्रचंड गर्दी असते. थोडासा एकांत हवा म्हणून काही पैसे खर्च करून मुंबईबाहेर जाणार आहोत,’ असे मंगेश शहा यांनी सांगितले.

छोट्याशा भेटीनेही ‘ती’ खुलते!
कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुण-तरुणींची पसंती आजही गुलाब, टेडीबिअर, मुंबईचे समुद्रकिनारे किंवा कॉफी शॉपलाच आहे. ‘खिसा तंग असताना ‘ती’ला आवडणारी एखादी लहानशी वस्तू भेट दिली तरी चालून जाते’ असे अद्वैत कर्णिक याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, WI vs ZIM: ७ चौकार, ७ षटकार... वानखेडेवर हेटमायरचं वादळ; झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना झोडपत विंडीजसाठी रचला वर्ल्डरेकॉर्ड

Virar News : मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे संदर्भात जपान आंतरराष्ट्रीय संस्था JICA यांची वसई-विरार शहर महानगरपालिकेला भेट

Latest Marathi News Live Update : गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाचा भाजीपाला, फळबागांना फटका

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी त्यांची खाती इतर मंत्र्यांकडे सोपवली; मोठं कारण आलं समोर, पडद्यामागे नेमकं काय घडलं?

IND vs SA: अरे बॉल दे ना... ! अहमदाबादमध्ये द. आफ्रिकेचा खेळाडू चाहत्यांवर भडकला; Video Viral

SCROLL FOR NEXT