Cm Eknath Shinde Raj Thackeray  Sakal
मुंबई

Mumbai News : राज ठाकरेंच्या हस्तक्षेपाने वरळी बीडीडी चाळ प्रकल्पाबाबत मोठा निर्णय; आता...

वरळी बीडीडी चाळीच्या पुनर्वसन प्रकल्पाच्या आराखड्यावरून स्थानिकांमध्ये संभ्रम आहे. तसेच सुधारित आराखड्यात वाढविण्यात आलेल्या मजल्यांवरूनही आक्षेप आहेत.

सकाळ वृत्तसेवा

वरळी बीडीडी चाळीच्या पुनर्वसन प्रकल्पाच्या आराखड्यावरून स्थानिकांमध्ये संभ्रम आहे. तसेच सुधारित आराखड्यात वाढविण्यात आलेल्या मजल्यांवरूनही आक्षेप आहेत.

मुंबई - वरळी बीडीडी चाळीच्या पुनर्वसन प्रकल्पाच्या आराखड्यावरून स्थानिकांमध्ये संभ्रम आहे. तसेच सुधारित आराखड्यात वाढविण्यात आलेल्या मजल्यांवरूनही आक्षेप आहेत. त्यामुळे स्थानिकांन आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रकल्प आराखड्याचे सादरीकरण करावे अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि म्हाडाकडे केली होती. या मागणीला यश आले असून आज (ता.११) रोजी वरळीत पुनर्वसन प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात येणार असल्याची माहिती म्हाडा मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी यांनी दिली आहे.

दरम्यान, वरळीतील नागरिकांचा वरळी बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्प आराखड्यातील काही बाबींबाबत आक्षेप आणि संभ्रम आहे. याबाबत नागरिकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन आपल्या मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या होत्या. याच मुद्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन वरळी बीडीडी चाळीतील रहिवाश्यांच्या मागण्या सरकारसमोर मांडल्या होत्या. प्रकल्पाच्या आराखड्याबाबत रहिवाश्यांमध्ये संभ्रम असून त्यांच्यासमोर पुनर्विकास प्रकल्पाचे सादरीकरण करावे अशी मागणीही यावेळी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

याअनुषंगाने, राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिलेल्या निर्देशानुसार म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे वरळी बी.डी.डी. चाळ पुनर्वसन प्रकल्पाबाबत बी.डी.डी. चाळींतील भाडेकरू आणि रहिवासी यांना माहिती देण्याच्या उद्देशाने दि. १२ मे रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता वरळी येथील जांभोरी मैदान येथे सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे. वरळी बीडीडी चाळींतील भाडेकरू आणि रहिवासी यांनी या सादरीकरणाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bike Taxi: अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप्सवर कारवाई करा, परिवहन मंत्र्याचे सायबर क्राईम विभागाकडे मागणी

BAN vs PAK 1st Test : बांगलादेशने घरी बोलवून पाकिस्तानला ठेचले; WTC मध्ये नाचक्की, शाहीन आफ्रिदीच्या संघाचा लाजीरवाणा पराभव

Kalyan Crime News : कल्याण हादरलं! 78 वर्षीय नराधम भोंदूबाबाचा 15 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; पूजेच्या बहाण्यानं केलं काळं कृत्य

Mohol Accident : ईरटीगा कार आणि मालट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : नाशिक TCS प्रकरण; आरोपी तौसीफ अत्तारला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT