विरार : पौराणिक तीर्थ तलावांची वसई
विरार : पौराणिक तीर्थ तलावांची वसई  sakal
मुंबई

विरार : पौराणिक तीर्थ तलावांची वसई

संदीप पंडित

विरार : वसई प्रांताच्या प्राचीन इतिहासात ऐतिहासिक संदर्भाप्रमाणे पौराणिक संदर्भाचे इतिहासात विशेष महत्व आहे. पौराणिक संदर्भाचा विचार करताना येथील तीर्थक्षेत्रे व त्यास लागून असणारे तलाव यांचा विचार करावा लागतो. सध्या जनसामान्यांना व अभ्यासकांना उपलब्ध संदर्भात 108 तलाव नमूद असल्याचे उल्लेख मिळालेले आहेत. पण त्यातील बरीच स्थळे नामशेष झालेली असून आजमितीला साधारणपणे 70 तीर्थ तलाव अस्तिवात आहेत असे म्हणण्यास वाव आहे. वसई विरार महानगरपालिका अंतर्गत यातील काही तलावाचे सुशोभीकरण करण्याचे काम गेल्या काही वर्षांत सुरू झालेले आहे.

पूर्वी तीर्थक्षेत्र नावाने प्रसिद्ध असणारी ही स्थळे सद्या जनसामान्यांना तलाव म्हणून अधिक परिचित आहेत. या तीर्थ तलावांच्या काठाशी असलेली जवळपास अधिकाधिक मंदिरे परकीय आक्रमकांनी व निसर्ग प्रभावाने नामशेष झाली आहेत. भारतीय युद्धकाळापर्यंतच्या (महाभारत) अगोदर स्थापन झालेल्या देवनगरी उर्फ निर्मळ प्रांतात याच्या पाऊलखुणा आजही पाहता येतात. वसई प्रांतातील प्रत्येक गावात तलावांची संख्या किमान दोन याप्रमाणे आहे. एकट्या गास गावातील 30 तीर्थांची शोध मोहीम व संशोधनपर लिखाण किल्ले वसई मोहिमेचे प्रमुख इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊत यांनी पहिल्यांदा २००८ मध्ये प्रकाशात आणले होते.

सद्या वाढत्या लोकवस्ती बदल, स्थानिक परिभाषा यांनी अनेक प्राचीन नावाचे अपभ्रंश होऊन नवीन नावे तयार झाली आहेत. ठाणे ग्याझेटर संदर्भ प्रमाणे तुंगार परिसरातील तलाव व कुंडे यांचा पेशवे कालखंडात जीर्णोद्धार करण्यात आला. सध्या गास, चक्रेश्वर (नालासोपारा), निर्मळ, वैतरणा, नील टेकडी, देवतलाव, उतळेश्वर, काकतीर्थ, विनायक तीर्थ, औदुंबर तीर्थ, लवणतीर्थ, रानगाव, ताम्रतीर्थ (तामतलाव), वसई किल्ला दांडाळे तलाव, नागेश महातीर्थ, कपिलकुंड, शाल्य तीर्थ, भगवती तीर्थ, पांडू तीर्थ, अरोग तीर्थ, उमेळे, गोखीवरे, बोलींज, सतपाळे, दिघी तलाव (होळी) इत्यादी अनेक तीर्थ अभ्यासकांच्या यादीत आहेत.

वरील यादीत नमूद केलेल्या सर्व स्थळांवर काही फुटके अवशेष, विखुरलेल्या मूर्ती, शिलालेख आजही दुर्लक्षित आहेत. पौराणिक संदर्भ जपणाऱ्या या तीर्थ तलावांचा पेशवे कालखंडात (1739 ते 1803) जीर्णोद्धार करण्यात आलेला असला तरी तत्कालीन राजकीय परिस्थिती पाहता जुने संदर्भ आजही संवर्धनासाठी वाट पाहत आहेत. या स्थळांचा संशोधन, संकलन, पर्यटन, पुरातत्त्व, अभिलेख इत्यादी सर्व पातळीवर विचार केल्यास हा अमूल्य ठेवा अनेकांना प्रेरणादायी ठरणार आहे.

किल्ले वसई मोहिमेचे प्रमुख व इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊत यांनी या बाबत सकाळशी बोलताना सांगितले कि. तलावांचे ठाणे अशी ठाण्याची ओळख आहे. त्यापेक्षा जास्त तलाव वसई मध्ये आहेत त्यामुळे याचे संवर्धन व्हायला हवे. "पौराणिक संदर्भ जपणारी ही तीर्थ स्थळे अत्यंत चिकित्सक पध्दतीने संशोधन करून येणाऱ्या काळात गास, निर्मळ, वसई किल्ला, चक्रेश्वर, होळी इत्यादी स्थळे सांस्कृतिक केंद्रे म्हणून नव्या जोमाने उदयास आली पाहिजेत. आम्ही सातत्याने संशोधन व संवर्धन क्षेत्रात योगदान देण्यासाठी कटिबद्ध आहोत."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Latest Marathi News Live Update : दादर पूर्वच्या शिंदे वाडी येथून १.१४ कोटींची रोकड जप्त

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Karmaveerayan: 'कर्मवीरायण' मधून उलगडणार कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र; 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

SCROLL FOR NEXT