tree plantation
tree plantation sakal media
मुंबई

कचऱ्याच्या जागेचे झाले सोने; कचरा कुंड्यांच्या जागी रोपांची लागवड

सकाळ वृत्तसेवा

वसई : वसई-विरार शहरात (vasai virar) सार्वजनिक ठिकाणी ठेवलेल्या कचराकुंड्या काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या कचरा कुंड्यांच्या जागी ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी व्यवस्था, रोपांची लागवड (tree plantation), तसेच इतर सुशोभीकरणाची कामे पालिकेतर्फे (vasai virar municipal corporation) करण्यात येत आहेत. कचऱ्यामुळे होणारी दुर्गंधी, अस्वच्छता लक्षात घेता कचऱ्याच्या जागेचे (trash) पालिकेकडून सोने करण्यात आले आहे, अशा प्रतिक्रिया शहरवासीयांमधून उमटू लागल्या आहेत.

वसई, विरार, नालासोपारा शहरात सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढीग, अस्वच्छतेचे साम्राज्य, त्यामुळे होणारा डासांचा प्रादुर्भाव या बाबी नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहेत. अनेकदा कचरा उचलला जात नाही. त्यामुळे स्वच्छतेचा बोजवारा निर्माण होत असतो. जनजागृती करूनही काही बेजबाबदार नागरिक सार्वजनिक ठिकाणी कचरा भिरकावून पुढे जातात. याच पार्श्वभूमीवर पालिकेने शून्य कचरा मोहीम आखण्यास सुरुवात केली असून, याचाच एक भाग म्हणून `कचराकुंड्या हद्दपार` हा उपक्रम हाती घेतला आहे.

पालिका हद्दीतील पेल्हार नालासोपारा, साईनाथ नगर यासह १५ ठिकाणी कचराकुंड्या हटविण्यात आल्या आहेत. त्या जागेत नागरिकांनी कचरा टाकू नये म्हणून आसनाची व्यवस्था, रोपे, विविध फूल झाडांची लागवड करून जागेचे सुशोभीकरण केले आहे. यामुळे कचऱ्याच्या दुर्गंधीपासून नागरिकांची मुक्तता तर झालीच आहे, परंतु परिसरातील वातावरण देखील प्रसन्न झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. पालिकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्र, वाचनालय, समाजोपयोगी उपक्रमदेखील हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी असणाऱ्या कचराकुंड्या हळूहळू हद्दपार होणार आहेत.

सार्वजनिक ठिकाणी पूर्वी कचराकुंड्या ठेवण्यात येत होत्या. मात्र त्या काढून जागेचे सुशोभीकरण केले जात आहे. शहरात काही मोजक्याच ठिकाणी असलेल्या कचराकुंड्या अन्यत्र हटविण्याची कार्यवाही सुरू आहे. शहर स्वच्छ, सुंदर असेल यावर भर दिला जात आहे.

- चारुशीला पंडित, उपायुक्त, वसई-विरार महापालिका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरू चेन्नई प्लेऑफच्या एका जागेसाठी भिडणार, पण पावसाचे अंदाज काय?

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Virat Kohli: भारतीय संघात संधी मिळण्यासाठी रैनाची कशी झाली मदत? विराटनं सांगितली 16 वर्षांपूर्वीची आठवण

Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदींनी रायबरेली, अमेठीत प्रचार करणे टाळले, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT