मुंबई

वाशी खाडी पुलावर जखमी अवस्थेत सापडलेल्या तरुणीचा गेला होता तोल

विक्रम गायकवाड

मुंबई: गेल्या मंगळवारी पहाटेच्या सुमारास वाशी खाडी पुलावर रेल्वे रुळाच्या बाजुला जखमी अवस्थेत सापडलेल्या तरुणीवर कुठल्याही प्रकारचा अतिप्रसंग झाला नसल्याचे उघड झालं आहे. तसंच लोकलमधून तोल जाऊन खाली पडली आणि त्यामुळे जखमी झाल्याचे तरुणीने दिलेल्या जबाबावरुन स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जखमी तरुणीवर लैंगिक अत्याचार करुन तिला धावत्या लोकलमधून ढकलून देण्यात आल्याची घटना घडली नसल्याचे रेल्वे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.   

या घटनेतील जखमी तरुणी ही टिटवाळा येथे आई-वडील आणि भावंडासह राहते. ती पवई भागात घरकाम करत होती. तसेच ती आठवड्यातून  एकदाच रविवारी आपल्या घरी जात होती. गेल्या रविवारी संध्याकाळी ती टिटवाळा येथून पवई येथे आपल्या कामावर निघून गेली होती. त्यानंतर मंगळवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास तरुणी वाशी खाडी पुलावर रेल्वे रुळाच्या बाजूला जखमी अवस्थेत आढळून आली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वाशी रेल्वे पोलिसांनी तरुणीला प्रथम वाशी येथील महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिला पुढील उपचारासाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  

दरम्यान, डॉक्टरांनी जखमी तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याबाबत संशय व्यक्त केला होता. त्यानंतर वाशी पोलिसांनी या प्रकरणात अज्ञात व्यक्ती विरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली होती. या तपासादरम्यान, वाशी रेल्वे पोलिसांनी जखमी तरुणीच्या नातेवाईकांचा शोध घेऊन तसेच तिचा मोबाईल क्रमांक मिळवून तांत्रिक तपास केला. रेल्वे स्टेशन वरील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली.  तिच्या संपर्कातील लोकांकडे विचारपूस केली. यादरम्यान,जखमी तरुणी शुद्धीवर आल्यानंतर तिच्यावर कुठल्याही प्रकारचा अतिप्रसंग झाला नसल्याचे तसेच ती स्वत: धावत्या लोकलमधून तोल जाऊन पडल्याचे आपल्या तिने आपल्या जबाबात स्पष्ट केले आहे.

गेल्या रविवारी पवई येथे घर कामावर गेलेली जखमी तरुणी सोमवारी सकाळी आपल्या आईची तब्येत खराब असल्याचे सांगून आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी गेली होती. यादरम्यान तरुणीने प्रियकराकडे लग्न करण्यासाठी तगादा लावल्याने तिच्या प्रियकराने तिला नकार दिला होता. त्यामुळे तरुणी तणावाखाली आल्याने ती सोमवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास कांजुरमार्ग रेल्वे स्थानकातून लोकलमध्ये चढली. त्यानंतर ती एकटीच लोकलमधून दिवसभर फिरत असल्याचे तपासात आढळून आले आहे. या दरम्यान ती दादर, कुर्ला त्यानंतर वाशी येथे गेली. त्यानंतर ती वाशी येथून पहाटेच्या सुमारास कुर्लाच्या दिशेने परतताना वाशी खाडी पुलाजवळ धावत्या लोकलमधून तोल जाऊन पडल्याचे तपासात आढळून आल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले.

------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Vashi creek railway bridge injured woman fallen off moving train

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौची सामन्यावर पकड, स्टॉयनिस अन् दीपक हुड्डा लढवला किल्ला

SCROLL FOR NEXT