हे सरकार तुकडे तुकडे गँगचे आहे की काय? आशिष शेलारांचा सवाल

हे सरकार तुकडे तुकडे गँगचे आहे की काय? आशिष शेलारांचा सवाल

मुंबईः भाजप आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसरात झालेल्या सीएए विरोधी आंदोलनावेळी मेहक प्रभू या तरुणीने फ्री काश्मीरचं पोस्टर झळकावलं होतं. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी सी रिपोर्ट दाखल केला आहे. यावरुनच शेलारांनी ठाकरेवर निशाणा साधला आहे. 

हे सरकार तुकडे तुकडे गँगचे आहे की काय?, असा सवाल उपस्थित करत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसरात सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करण्यासाठी आंदोलन करण्यात आलं होतं. मेहक मिर्झा प्रभू या तरुणीनं या आंदोलनात सहभाग नोंदवला होता. यावेळी मेहकनं  फ्री काश्मीर (काश्मीर मुक्त करा) पोस्टर झळकावलं होतं. या पोस्टरवरुन बराच वाद निर्माण झाला. 
त्यानंतर मेहकविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी सी रिपोर्ट दाखल केला. 

यावरुनच भाजपनं ठाकरे सरकारवर टीका केली आहे. भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करत ठाकरे सरकारला काही प्रश्न विचारले आहेत.

आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, कसाबचा पाहुणचार बिर्याणीने
केला, कन्हैया ज्यांना आपलासा वाटतो.. त्या आघाडीच्या ठाकरे सरकारचे आता शहरी नक्षलवाद्यांना रेड कार्पेट? आझाद काश्मीरचा नारा देणाऱ्या मेहक प्रभूच्या "हातात" मुंबई पोलिस आता निर्दोषत्वाचा दाखला देणार? हे सरकार तुकडे तुकडे गँगचे आहे की काय?

मेहक प्रभू कोण आहे? 

1982 मध्ये जन्मलेली मेहक प्रभूचं संपूर्ण नाव मेहक मिर्झा प्रभू असं आहे. मेहक मुंबईची रहिवाशी आहे. ती लेखक असून लघू कथाही लिहिते. मेहक ब्लॉगही चालवते. 

Bjp mla ashish shelar uddhav thackeray Government mehak prabhu

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com