Blood test
Blood test 
मुंबई

वाशी रुग्णालयातील रक्ततपासणी बंद 

सकाळवृत्तसेवा

तुर्भे  - वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयातील रक्ततपासणी केंद्रातील यंत्रणा तीन महिन्यांपासून बंद असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे खासगी लॅबमधून तपासणी करून घेण्यासाठी त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. 

तुर्भे येथील इंदिरानगरमधील शिवसेना शाखाप्रमुख महेश कोटीवले नातेवाईकांना घेऊन वाशीतील पालिका रुग्णालयात रक्ततपासणीसाठी गेले होते, तेव्हा तेथील मोफत रक्ततपासणी यंत्रणा तीन महिन्यांपासून बंद असल्याचे त्यांना सांगून बाजूच्या एसआरएल या खासगी सेंटरमधून रक्ततपासणी करून घेण्याचा सल्ला दिला. मात्र खासगी सेंटरमधील रक्ततपासणी खर्चिक असल्याने अनेक रुग्णांना ती परवडत नाही. त्यामुळे ही यंत्रणा सुरू करावी, अशी मागणी त्यांनी पालिकेकडे केली आहे. तुर्भे व कोपरखैरणे येथील माता-बाल रुग्णालयातील सेवा दोन वर्षांपासून कोलमडली असल्याने वाशीतील रुग्णालयावर त्याचा ताण पडत आहे. वाशीतील पालिका रुग्णालयात मोफत रक्ततपासणी होत असताना आता तेथील यंत्रणा बंद असल्याने रुग्णांना त्यासाठी 180 रुपये खर्च करावे लागत आहेत. वेगळ्या आजारासाठी रक्ततपासणीचे वेगवेगळे दर आहेत. 

पालिका रुग्णालयाच्या रक्ततपासणी केंद्रातील यंत्रणेमध्ये बिघाड निर्माण झाल्याने ते बंद आहे. दोन दिवसांत त्याची दुरुस्ती करून घेतली जाईल. 
- डॉ. प्रशांत जवादे, वैद्यकीय अधिकारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT