Veermata Jijabai Bhosale zoo Central govt rejected proposal for zebra lion animal mumbai sakal
मुंबई

राणीच्या बागेत झेब्राही नाही अन् सिंहही नाही, केंद्राने प्रस्ताव फेटाळला

उद्यान प्रशासन झेब्रा मिळवण्यासाठी नवा देश शोधत आहे. परिणामी, राणीच्या बागेतील पांढऱ्या सिंहाचे आगमनही लांबणीवर टाकले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात इस्राईलच्या रमत गन सफारी पार्कमधून दोन झेब्रा मिळवण्यासाठी उद्यान विभागाने तीन वर्षांपूर्वी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला; पण इस्राईल ‘आफ्रिकन हॉर्स सिकनेस’ आजारापासून मुक्त नसल्याने प्राणिसंग्रहालयाचा हा प्रस्ताव केंद्र सरकारने रद्द केला. त्यामुळे उद्यान प्रशासन झेब्रा मिळवण्यासाठी नवा देश शोधत आहे. परिणामी, राणीच्या बागेतील पांढऱ्या सिंहाचे आगमनही लांबणीवर टाकले आहे.

भायखळा उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाने जुनागढ सक्करबाग गुजरातमधील प्राणिसंग्रहालय आणि इंदूरमधील कमला नेहरू प्राणिसंग्रहालय येथून पांढरा सिंह घेण्याची योजना आखली होती. त्याबदल्यात राणीच्या बागेकडून झेब्रा देण्यात येणार होता. त्यासाठी गतवर्षी थायलंडस्थित गोट्रेड फार्मिंग कंपनी लिमिटेडला या झेब्राची खरेदी आणि वाहतूक करण्याचे कंत्राट देण्यात आले होते. याबाबत प्राणिसंग्रहालयाने केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाकडे प्रस्ताव पाठवला होता; मात्र प्राणिसंग्रहालयाचा प्रस्ताव केंद्राने नाकारला आहे. इस्राईलला ‘आफ्रिकन हॉर्स सिकनेस’चा (एएचएस) अधिकृत दर्जा नाही असे त्यांनी म्हटले आहे. ‘वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर अॅनिमल हेल्थ’नुसार आफ्रिकन घोड्यांच्या आजारपणाच्या बाबतीत इस्राईल हा ‘एएचएस’साठी अधिकृत दर्जा नसलेल्या देशांपैकी एक आहे. भारत हा ‘एएचएस’मुक्त देश म्हणून ओळला जातो. झेब्राच्या आयातीला केवळ एएचएसपासून मुक्त देशातून परवानगी दिली जाते.

त्यामुळे प्राणिसंग्रहालय प्रशासन आता झेब्रा मिळवण्यासाठी नवा देश शोधत असल्याचे संचालक संजय त्रिपाठी यांनी सांगितले. राणीच्या बागेला झेब्रा मिळाल्यानंतर तो गुजरातमधील प्राणिसंग्रहालयाला देऊन त्याबदल्यात सिंह घेण्याची योजना होती. त्यामुळे आता झेब्रा आल्याशिवाय सिंह येणार नसल्याचे सांगण्यात आले.

सिंहाची प्रतीक्षा

वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयात २००५ पर्यंत तीन सिंहांचे निवासस्थान होते. या प्राणिसंग्रहालयात शेवटच्या सिंहिणीचे नाव होते जिमी. ती २०१४ मध्ये दीर्घ आजारामुळे मरण पावली. त्यापूर्वी २०१० मध्ये अनिता नावाच्या २२ वर्षांच्या एशियाटिक सिंहिणीचे वृद्धापकाळाने निधन झाले होते. तेव्हापासून प्राणिसंग्रहालयाला सिंहाच्या आगमनाची प्रतीक्षा लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT