vehicle parking application in mumbai to park vehicle available parking fees
vehicle parking application in mumbai to park vehicle available parking fees  esakal
मुंबई

Mumbai Vehicle Parking App : पार्किंगसाठी मुंबईत आता अॅप

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबईत पार्किंगसाठी आता अॅप उपलब्ध होणार आहे. वाहन तऴांची उपलब्धता, बुकींग आणि शुल्क भरण्याची सुविधा आता अॅपवर उपलब्ध होणार आहे. शहर आणि उपनगरात वाहन व्यवस्थापन आराखड्याचा विस्तार करण्याचा पालिका प्रशासने निर्णय घेतला आहे.

पालिकेने वाहनतळाचे नियमन करण्यासाठी १५ तज्ज्ञांची समिती २०१९ मध्ये तयार केली. मात्र कोरोना टाळेबंदीमुळे त्यांचे काम पुढे जाऊ शकले नाही. १८ जानेवारी, २०२१ रोजी ही समिती पुन्हा एकदा नियुक्त केली आहे.

या समितीचे प्रमुख म्हणून सेवानिवृत्त ‘आयएएस’ अधिकारी रामनाथ झा आणि त्यांच्याबरोबर काही नगरनियोजनतज्ज्ञ, वाहतूक धोरण आणि सामाजिक विषयांचे काही प्रतिनिधी सभासद यांच्याकडून व्यापक अशी दाटीवाटीच्या मुंबई शहराकरिता वाहनतळ धोरण योजना ठरविले आहे.

पालिकेच्या व सरकारी कार्यालयांची पार्किंगसंबंधी सर्व खाती, पोलीससंबंधी खाते, रस्ता वाहतूक प्राधिकरण (आरटीओ) आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसीएल) यांचे प्रतिनिधी यांचा समावेश असलेल्या वाहतूक प्राधिकरण स्थापनेचे काम हाती घेतले आहे. त्यांच्या मार्फत वाहतूक व्यवस्थापन आराखड्याचा विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

पार्किंग व्यवस्थापन होणार सुलभ

मुंबईतील सर्व २४ वॉर्डांकरिता प्रत्येक वॉर्डात वाहतूक व्यवस्थापन आराखडा (पीएमपी) तयार केला जाईल व त्यात रस्त्यावरच्या व रस्त्याबाहेरच्या पार्किंगकरिता जास्तीत जास्त सोईचे अशी पार्किंग व्यवस्था असेल. मुंबईत पार्किंगसाठी आता अॅप उपलब्ध होणार आहे.

वाहन तऴांची उपलब्धता, बुकींग आणि शुल्क भरण्याची सुविधा आता अॅपवर उपलब्ध होणार आहे. सुरक्षा सुलभता आणि सार्वजनिक हिताच्या दृष्टीने मुंबई वाहनतळ प्राधिकरणाची स्थापना करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

Heeramandi The Diamond Bazar : भन्साळींच्या भाचीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; 'या' अभिनेत्रीने ट्रोलर्सला सुनावले खडेबोल

Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल

Akshaya Tritiya 2024: अक्षय तृतीयेला सोन खरेदीवर विशेष ऑफर! मेकिंग चार्जेसवर ज्वेलरी ब्रँड देत आहेत खास सवलत

Latest Marathi News Update: लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये 31 तर दिंडोरीत 10 उमेदवार रिंगणात

SCROLL FOR NEXT