Mumbai Crime
Mumbai CrimeSakal

Mumbai Crime : फोन वापरण्यास घरच्यांचा विरोध; 9वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीची आत्महत्या

अल्पवयीन मुलीने घराच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे.

मुंबई : आईवडिलांनी मोबाईल वापरण्यास विरोध केल्यामुळे इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ही धक्कादायक घटना मुंबईतील मलाड परिसरात घडली असून तिचा मोबाईल घरच्यांकडून हिसकावून घेण्यात आला होता.

Mumbai Crime
Viral Video : हातात सिगारेट घेत तरूणींनी केला राष्ट्रगीताचा अपमान

दरम्यान, या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून घरच्यांसोबत वाद झाल्यानंतर तिने घरातून पळ काढल्याची माहिती आहे. सोशल मीडियावर किती वेळ घालवतेस? असा प्रश्न करत तिच्या घरच्यांकडून फोन काढून घेण्यात आला होता. या रागातून तिने सातव्या मजल्यावरून उडी मारली आहे.

सदर मुलगी ही इयत्ता नववीत शिकत होती. तिने रागातून घरही सोडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सोशल मीडियावर वेळ घालवते म्हणून तिच्या कुटुंबियांचे आणि तिचे अनेकदा वाद झाले होते. शेवटी फोन हिसकावून घेतल्यानंतर तिने टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com