mohammad aziz
mohammad aziz 
मुंबई

ज्येष्ठ गायक मोहम्मद अझीझ यांचे निधन

वृत्तसंस्था

मुंबईः बॉलिवूडमधील ज्येष्ठ गायक मोहम्मद अझीझ यांचे आज (मंगळवार) येथील नानावती रुग्णालयात निधन झाले. ते 64 वर्षांचे होते. बॉलिवूडसह बंगाली व ओडिया चित्रपटांसाठी त्यांनी गाणी गायली होती.

मोहम्मद अझीझ यांचा कोलकता येथे सोमवारी गाण्याचा कार्यक्रम होता. आज (मंगळवार) दुपारी मुंबई विमानतळावर आल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. उपचारासाठी त्यांना नानावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हृदय विकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मुंबईमध्ये त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

मोहम्मद अझीझ यांचा जन्म 2 जुलै 1954 रोजी पश्चिम बंगालमधील अशोकनगर मध्ये झाला होता. 1980-90 दरम्यान त्यांनी सुपरहिट गाणी गायली. 'आपके आ जाने से...' हे गाणे आजही प्रसिद्ध आहे. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, गोविंदा, ऋषी कपूर, मिथून चक्रवर्ती व अन्य अभिनेत्यांसाठी त्यांनी प्रामुख्याने गायन केले. गायिका लता मंगेशकर, आशा भोसले, अनुराधा पोडवाल व कविता कृष्णमुर्ती यांच्यासोबत त्यांनी अनेक गाणी गायली. विविध भाषांमधील 20 हजारहून अधिक गाणी त्यांनी गायली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 06 मे 2024

Women’s T20 World Cup: स्कॉटलँडने रचला इतिहास, वर्ल्ड कपचं पहिल्यांदाच मिळवलं तिकीट; श्रीलंकाही ठरले पात्र

Sharad Pawar : बारामतीकरांना धक्का अशक्य;निवडणुकीची अमेरिकेतही उत्सुकता

SCROLL FOR NEXT