मुंबई

वाचा निवडणुकीवर कितीचा लागलाय सट्टा..

सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्रात आज मतदान पार पडतंय. अशातच आता निवडणुकीसाठी सट्टा बाजारही सज्ज आहे. महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये होणार्या निवडणुकांवर तब्बल  30 कोटींचा सट्टा लागलाय. 

होय,राज्यातल्या निवडणुकीवर एक दोन नव्हे तर तब्बल 30 कोटींचा सट्टा लागलाय. सट्टेबाजारात महायुती आघाडीवर असून त्यांना 200हून अधिक जागा मिळतील असा अंदाज आहे. मात्र 220चा आकडा गाठताना युतीची दमछाक होईल असाही होरा आहे.  काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी जेमतेम 55 ते 60 जागांची मजल गाठेल, असाही एक अंदाज आहे. तर एमआयएम आणि मनसे यांना प्रत्येकी एक किंवा दोन जागांवर समाधान मानावे लागेल, असा सट्टेबाजांचा होरा आहे.  

सट्टाबाजारातल्या अंदाजानुसार

  • भाजप : १२० जागा, १.६० रुपये भाव 
  • शिवसेना : ८५ जागा, ३ रुपये भाव 
  • काँग्रेस : ३० जागा, २.५० रुपये भाव 
  • राष्ट्रवादी : ३० जागा, ३.५० रुपये भाव 

सुत्रांच्या माहितीनुसार निवडणुकीच्या सट्टेबाजीसाठी विशेष पोर्टल तयार करण्यात येतात. विशिष्ट यूजर आयडी आणि पासवर्ड सट्टेबाजांना कळवले जातात. हा तपशील व्हॉट्ऍपद्वारे संबंधित व्यक्तीला पाठवला जातो. त्यानंतर मोबाईल ऍप अथवा पोर्टलद्वारे सट्टा लावला जातो.

पैसे घेणारा आणि देणारा एकमेकांच्या संपर्कात नसल्यामुळे सरकारी यंत्रणांना सट्टेबाजांपर्यंत पोहचणं शक्य होत नाही. त्यामुळेच सट्टेबाजांचं चांगलंच फावतंय. 

WebTitle : vidhansabha election 2019 betting during maharashtra election

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : शिरूरमध्ये गोळीबाराचा थरार; हरी गंगावणे यांचा मृत्यू, CCTV फुटेज समोर

UPI MDR Charge: UPI पेमेंटवर चार्ज लागू झाला तरी हे 6 UPI व्यवहार फ्री! एक रुपयाही चार्ज नाही; जाणून घ्या कोणते

IND vs PAK Asian Games : श्रेयस अय्यरचा संघ आशियाई स्पर्धेत पाकिस्तानला भिडणार? जाणून घ्या हा महामुकाबला केव्हा होणार

Marathi News Live Updates : शिरूरच्या आंबेडकर नगरमध्ये गोळीबार; दुचाकीवरून जात असलेल्या तरुणावर झाडल्या गोळ्या

Tukaram Mundhe:तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांमधील भरमसाठ बिलांचा पर्दाफाश तुमची कशी होतेय लूट?

SCROLL FOR NEXT