मुंबई

साथीच्या आजारांची दहशत

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : गेला आठवडाभर रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले. त्यामुळे अनेक तालुक्‍यांत पूर आला. या अस्मानी संकटानंतर रायगड जिल्ह्यावर रोगराईचे संकट घोंगावत असून ताप, हगवण, कावीळ यांसारख्या साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. अशा रुग्णांच्या संख्येत तब्बल २० टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात या आजारांची दहशत आहे. 

महाड, पेण या दोन तालुक्‍यांना पुराचा मोठा तडाखा बसला आहे. त्याव्यतिरिक्त अन्य तालुक्‍यातही मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी तुंबले होते. आता पूर ओसरला असला तरी ठिकठिकाणी कचरा साचला आहे. अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे रोगराईचे संकट आहे. 

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात जलजन्य आजारांनी त्रस्त असणाऱ्या रुग्णांची संख्या साधारण २० टक्‍क्‍यांनी वाढली आहे. मे-जून महिन्यात अभावानेच रुग्ण दवाखान्यात येत असत; मात्र आता रुग्णांची संख्या वाढल्याने उपचारासाठी डॉक्‍टरांचीही संख्या कमी पडत आहे. जिल्हा आरोग्य विभागाने साथीच्या रोगांची लागण होऊ नये, यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. यासाठी जनजागृती मोहीम आखली आहे. परंतु त्यानंतरही ताप, हगवण, डेंगी यासारख्या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. 

जिल्हा रुग्णालयाचा कारभार कासवगतीने
अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दर्जेदार सुविधा पुरवण्यात आल्या आहेत; मात्र अपुरे कर्मचारी, डॉक्‍टरांची अपुरी संख्या यामुळे आरोग्य सेवेवर परिणाम होत आहे.जिल्हा रुग्णालयाला ठिकठिकाणी गळती लागली आहे.  याचबरोबर पावसाळ्यात रुग्णालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले असते. परिसरातील झुडपांमुळे येथे डांसाचा प्रादुर्भाव अधिक आहे. त्याचा त्रास रुग्णांबरोबरच त्यांच्या नातेवाईकांना होत आहे.

जिल्हा रुग्णालयात तात्पुरत्या स्वरूपात डॉक्‍टर नेमण्याची प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सुरू आहे. एमबीबीएस डॉक्‍टर मिळत नसल्याने बीएएमएस डॉक्‍टर घेण्यात येत आहेत. रुग्णालयाला निधीचीही कमतरता जाणवते. यामधून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
- डॉ. अजित गवळी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय

श्रीवर्धनमध्‍ये वडवली गावात डेंगीची साथ होती. यासाठी उपाययोजना केल्या आहेत.
- डॉ. सुरेश देवकर, जिल्हा आरोग्य अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे पहिल्यांदाच काँग्रेसला देणार मत; मतदानापूर्वी केली मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update: लोकसभेच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी लातूरमधील उदगीर येथे दाखल

Majhyashi Nit Bolaycha Rap Song: अनीचा आळस आणि आईचा ओरडा; 'या' तरुणानं लिहिलेलं भन्नाट रॅप साँग सोशल मीडियावर घालतंय धुमाकूळ

Summer Trip: उन्हाळ्यात चेरापुंजीला फिरायला जाण्याता प्लॅन करत असाल तर 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या

IPL 2024 DC vs MI Live Score : वूडने मुंबईला मिळवून दिलं तिसरं यश, पण दिल्लीचीही 200 धावांकडे वाटचाल

SCROLL FOR NEXT