मुंबई

मोठी बातमी : व्हायरल झालेला 27 जानेवारी आणि 18 फेब्रुवारी 2021 चा 'तो' शासन निर्णय बनावट

मिलिंद तांबे

मुंबई, ता. 3: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय पुणे, नांदेड, नागपूर आणि चंद्रपूर येथे अतिविशेषोपचार रुग्णालय सुरु करण्यासाठी प्रथम टप्प्याकरिता आवश्यक 888 पदांच्या निर्मितीबाबतचा शासन निर्णय प्रसारीत करण्यात आला आहे. हा शासन निर्णय बनावट असल्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये येथे पदभरती बाबतचा शासन निर्णय 27 जानेवारी 2021 रोजी जाहीर करण्यात आला. त्याआधी आरोग्य सेवक पदाची अंतिम निवड यादी याबाबतचा 18 फेब्रुवारी 2021 रोजीचा दुसरा बनावट शासन निर्णय प्रसारीत करण्यात आला. समाज माध्यमांमध्ये प्रसारीत होणारे हे शासन निर्णय बनावट असल्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

या बनावट शासन निर्णयात विभागाचे नाव वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग दर्शविले असून शासन निर्णय क्रंमाकात वैसेवा-1 कार्यासनाचा उल्लेख आढळतो. मात्र समाज माध्यमांमध्ये प्रसारीत होणारा शासन निर्णय राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातील वैसेवा-1 कार्यासनाकडून निर्गमित करण्यात आलेला नसल्याचे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने स्पष्ट केले आहे.

या बनावट शासन निर्णयामुळे अनेक नोकरी इच्छुक उमेदवारांची फसवणूक होण्याची किंवा झाल्याची शक्यता नाकारता येत नसल्याने आज वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने याबाबत स्पष्टीकरण केले आहे.

viral GR dated on 27th January and 18th February are fake explanation by medical education department

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT