Folk Art sakal media
मुंबई

विरार : पितृपक्षात घरोघरी फिरून जपतात शिवकालीन करपावली कला

संदीप पंडित

विरार : शिवाजी महाराजांच्या काळातील हेरगिरासाठी बहिर्जी नाईक (Bahirji Naik) यांनी अनेक कला विकसित (Arts developments) केल्याचे दाखले आपल्याला इतिहासात (history) मिळतात. त्यांनी हेरगिरी करताना कधी पक्षाचे आवाज, कधी लोक कलेचा आधार तर कधी वेगवेगळ्या वाद्यच्या आवाजातून गुप्त संदेश देण्यात येत होते. अशीच एक लोककला (Folk Art) म्हणजे करपावली कला, या कलेत दोन माणसे एकमेका पासून लांब उभी राहून फक्त हाताच्या बोटांनी खुणा करून एकमेकांची भाषा (Language) ओळखत असतात. सद्या पितृपक्ष सुरु असून वसई सह बाजूच्या तालुक्यात हि कला सादर करणार मोट्या प्रमाणत फिरून पितरांच्या नावाने नावे ओळखून दोन पैसे कमावत आहेत.

करपावली भाषा ही सद्या फक्त मुके किंवा बहिऱ्या माणसामध्ये खाणाखुणा करून बोलली जाते. हि शिवकालीन भाषा आजही काही लोक कलाकारांनी जपून ठेवली आहे. यामध्ये संभळ वाजवत आणि देवाचे नाव घेत हि कला सादर केली जाते. इतर वेळी देवीचे जागरण किंवा गोंधळ घालणारे हे कलाकार पितृ पक्षात मात्र ठाणे , पालघर, मुंबई, सातारा, पुणे, कोकण याभागात फिरताना आढळून येत आहेत. गळ्यात कवड्यांची माळ ,टाळ , तुणतुणं,आणि संभळ घेऊन हे कलाकार आपली कला सादर करत आहेत.

गेल्या दीड वर्षात या कलावंतांची कोरोनामुळे मोठी आबाळ झाली असल्याचे या कालावन्ताणी सांगितले. हाताला कामी नाही मंदिरे बंद, कार्यक्रम बंद. त्यामुळे मोठी जगायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला होता. आता आम्ही कोरोनाचे नियम पाळून आमची कला सादर करत आहोत. या काळात शासनाने कोणत्याही प्रकारचे साहाय्य आम्हाला केले नाही. हि पण एक लोक कला असून शासनाने आम्हाला मदत करावी अशी अपेक्षा दतात्रय नामदेव चव्हाण या कलाकाराने सकाळशी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway News: प्रदूषणाला रेल्वेचं जोरदार उत्तर! आता पैसा अन् वेळही वाचणार; भारतीय रेल्वेची नवी वाहतूक क्रांती सुरू, योजना काय?

Pune Court Decision: पतीला जीव देण्यास प्रवृत्त केलं, पत्नीला सात वर्षांची सक्तमजुरी! दुसरा विवाह अन्...

Latest Marathi Breaking News Live Update: शिवसेना ठाकरे पक्षाचे एबी फॉर्म चोरीला - अनिल देसाई

Akola News : सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे खाजगीकरण करण्याचा डाव; आ. साजिद खान यांचा स्फोटक आरोप

Leopard Attack : दोन बिबट्यांचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला; जीव धोक्यात घालून मेंढपाळ महिलेने केला प्रतिकार

SCROLL FOR NEXT