मुंबई

Virar Teacher Video: कोचिंग क्लासही सुरक्षित नाहीत! अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ, संतप्त पालकांनी शिक्षकाची काढली धिंड

Harassment minor girl: प्रदीप मोहनलाल मोर्या असे आरोपी शिक्षकांचे नाव असून हा विरार पूर्व कारगिल नगरमधील ओम स्वामी लीला अपार्टमेंटमध्ये आपल्या परिवारासह राहतो. याच परिसरात आरोपीचे इशांत कोचिंग क्लासेस आहेत. या क्लासेसमध्ये एक शिक्षक आणि 4 महिला शिक्षिका आहेत. पीडित मुलगी ही 7 वी मध्ये शिकत असून दुपारी 4 ते 6 या वेळेत ती निशांत या क्लासेसमध्ये जात होती.

सकाळ वृत्तसेवा

नालासोपारा: खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाने त्याच्या क्लासमधील 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला ऑफिसमध्ये बोलावून, तिच्याशी अश्लील वर्तन केल्याच्या आरोपाखाली संतप्त पालक व स्थानिक नागरिकांनी, शिक्षकाला जाब विचारून, मारहाण करीत चक्क अर्धनग्न धिंड काढत शिक्षकाला पोलिसांच्या ताब्यात दिल्याचा धक्कादायक प्रकार विरारमध्ये घडला आहे. याबाबत पीडित मुलीच्या तक्रारीवरून विरार पोलीस ठाण्यात भादवी कलम 74, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनयम 2012 चे कलम 8, 12 प्रमाणे गुन्हा दाखल करून, आरोपी शिक्षकाला अटक केले आहे.

प्रदीप मोहनलाल मोर्या असे आरोपी शिक्षकाचे नाव असून हा विरार पूर्व कारगिल नगरमधील ओम स्वामी लीला अपार्टमेंटमध्ये आपल्या परिवारासह राहतो. याच परिसरात आरोपीचे कोचिंग क्लासेस आहे. या क्लासेसमध्ये एक शिक्षक आणि 4 महिला शिक्षिका आहेत. पीडित मुलगी ही 7 वी मध्ये शिकत असून दुपारी 4 ते 6 या वेळेत ती निशांत या क्लासेसमध्ये जात होती.

पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 21 ऑगस्ट रोजी क्लास संपल्यावर क्लासचा अभ्यास घेऊन ऑफिसमध्ये जात असताना, त्याने पीडित मुलीला ऑफिसमध्ये बोलावून, 'तुम मेरे साथ प्रेमसंबंध करोगी क्या?' असं विचारलं. त्यानंतर घाबरून पीडित मुलगी निघून गेली. पुन्हा दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये बोलावून तुमको मैने जो पुच्छा उसका जवाब नही दिया, असे विचारून मुलीच्या खांद्यावर हात टाकून तिच्याशी अश्लील वर्तन केले. यानंतर मुलगी क्लासला जायला नकार देत असल्याने तिच्या आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारले असता, हा सर्व प्रकार उघड झाला आहे.

बुधवार, दि. 28 रोजी सकाळी 10 वाजता संतप्त पालकांनी क्लासमध्ये जाऊन, शिक्षकाला जाब विचारात महिला पुरुषांनी त्याला बेदम चोप देऊन, आरोपी शिक्षकाची अर्धनग्न धिंड काढत पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.

बदलापूर घटनेला अवघा आठवडाच उलटला आहे. पुन्हा विरारमध्ये अल्पवयीन मुलींशी अश्लील वर्तनाची घटना समोर आली आहे. त्यामुळे आपल्या मुली सुरक्षित कशा ठेवायच्या असा प्रश्न पालकांना पडला आहे.

पीडित मुलीच्या तक्रारीवरून आम्ही गुन्हा दाखल करून, आरोपीला अटक केले आहे. संतप्त नागरिकांनी मारहाण केल्याने शिक्षक जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार करून, आज वसई न्यायालयात हजर करणार आहोत. त्यानंतर तपासात नेमका काय प्रकार आहे ते उघड होईल

विजय पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विरार पोलीस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT