मुंबई

कल्याण-डोंबिवलीत माणुसकीची भिंत; गरजूंसाठी महापालिकेचा हेल्पिंग हॅण्ड 

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आजही शहरातील अनेक गरजूंना पोहोचत नाहीत. याचसाठी लोकसहभागातून पालिका प्रशासनाने पुढाकार घेतला असून "हेल्पिंग हॅण्ड' या संस्थेच्या मदतीने कल्याण-डोंबिवली शहरात माणुसकीची भिंत उभारण्यात आली आहे. कल्याणमध्ये या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 

डोंबिवली पालिका मुख्यालयाच्या आवारातही सोमवारपासून या माणुसकीची भिंत उपक्रमाची सुरुवात होत असून डोंबिवलीकरांनीही गरजूंच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. शहरातील स्टेशन परिसर, मुख्य कार्यालय, मंदिराबाहेरील परिसर पाहिला तर दररोज अन्न मागून पोट भरणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. या सर्व नागरिकांना सहजरित्या वस्त्र उपलब्ध व्हावे यासाठी कल्याण-डोंबिवली पालिकेने पुढाकार घेतला आहे. घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे आणि उपअभियंता मिलिंद गायकवाड यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. कल्याण येथील ब प्रभागातील राणी लक्ष्मीबाई उद्यानात ही माणुसकीची भिंत उभारण्यात आली आहे. या उपक्रमासाठी पालिकेने जागा उपलब्ध करून दिली असून देखरेखीची व्यवस्था हेल्पिंग हॅण्ड या सामाजिक संस्थेला देण्यात आली आहे. 

सोमवारी उद्‌घाटन - 
कल्याणपाठोपाठ डोंबिवलीतही माणुसकीची भिंत उभी राहात असून महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालय परिसरात त्याचे काम सुरू आहे. या भिंतीचे सोमवारी उद्‌घाटन होणार असल्याची माहिती "फ' प्रभाग क्षेत्र अधिकारी राजेश सावंत यांनी दिली.

The wall of humanity in Kalyan-Dombivali Municipal helping hand for the needy

===---------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

Junnar News : शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

लहानपणीचं गाणं आजही तोंडपाठ आहे, पण कालचा अभ्यास लक्षात राहत नाही; असं का? जाणून घ्या मेंदूचं रहस्य

Marathi News Live Updates: धाराशिवमध्ये पावसाला सुरुवात

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

SCROLL FOR NEXT